पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे:- विमानतळ पोलीस स्टेशनकडून संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारा आरोपी जितेंद्र अशोक भोसले ( टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील त्याचा एक साथीदार यांचे गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस यांनी दिली आहे.
विमानतळ पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हे करणारे गुन्हेगार नामे जितेंद्र अशोक भोसले, वय-३८, रा. सनं. २३०, बंगाला नं.३. गंगा निबुला सोसायटी जवळ विमाननगर, पुणे (टोळी प्रमुख ) व त्याचा साथीदार सतिश एकनाथ कोल्हे, वय ३८, रा. जयप्रकाशनगर, येरवडा, पुणे याचेवर विमानतळ पोलीस स्टेशन गु.र.नं.३३१/२०२२, भादंविक ३८४, ३४ अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा हा यातील संघटीत गुन्हेगारी टोळीचा प्रमुख व त्याचा इतर एक साथीदार यांनी आपल्या संघटीत गुन्हेगारी टोळीचे सदर भागात वर्चस्व अबाधित राखण्याच्या तसेच प्रभुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेला आहे. यातील आरोपी नामे जितेंद्र अशोक भोसले, रा. सनं. २३०. बंगाला नं.३. गंगा निबुला सोसायटी जवळ, विमाननगर, पुणे हा मुख्य (टोळी प्रमुख) असुन त्याने त्याचा साथीदार सतिश एकनाथ कोल्हे, रा. जयप्रकाशनगर, येरवडा, पुणे याचेसह विमानतळ पोलीस स्टेशन परिसर या भागात बेकायदेशीरित्या खंडणी मागणे, खंडणी गोळा करणे, बेकायदा जमाव जमवुन, मारहाण व दुखापत करणे, मालमत्ताचे नुकसान करून जीवे ठार मारण्याची धमकी देणे असे गुन्हे दाखल असून, नमुद आरोपी जितेंद्र अशोक भोसल याने त्याचा साथीदार सतिश एकनाथ कोल्हे याचेसह स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी विमानतळ पोलीस स्टेशन परीसरात दहशत असून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, खंडणी नागणे अशा प्रकारचे स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी प्रस्तुत गुन्हा केलेला आल्याचे दिसून आलेने व वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा बजावत नसल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२) व ३ (४) चा अंतर्भाव करणेकामी विमानतळ पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भरत जाधव यांनी मा. श्री रोहीदास पवार, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-४ पुणे शहर यांचे मार्फतीने मा. श्री नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे यांना सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करून आरोपी नामे यांचेविरूध्द विमानतळ पोलीस स्टेशन गु.र.नं. ३३१ / २०२२. भादंविक ३८४,३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) . ३ ( २ ) व ३ ( ४ ) अंतर्भाव करण्याची नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे यांनी मान्यता दिली आहे.. सदर गुन्हयाचा पुढील तपास किशोर जाधव, सहा पोलीस आयुका, येरवडा विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, संदिप कर्णिक, नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, रोहीदास पवार, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४ पुणे शहर किशोर जाधव, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव पोलीस निरीक्षक (गुन्हे), मंगेश जगताप यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालु वर्षातील ३२ वी व एकुण ९५ वी कारवाई आहे.

