अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सततच्या दुष्काळामुळे आधीच शेतकरी राजा त्रस्त असून यातच आता रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. मिश्र खते, सुपर फास्फेट, पोटॅश यांच्या भावात वाढ झाली. दरम्यान, आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खते महागल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी जगण्यासाठी संघर्ष करीत असताना ही वाढ शेतकऱ्यासाठी डोकेदुखी झाली आहे.
शेती करण्यासाठी आवश्यक खते, बी बियाणे आणि अन्य आवश्यक साहित्यात होणारी वाढ शेतकऱ्या वर आर्थिक भुर्दंड होत आहे. या वाढत्या कीमती मुळे त्रस्त शेतकरी आपली शेती कशी करणार हा प्रश्न त्याच्या समोर उभा ठाकला आहे.
शासन स्तरावर शेती उत्पन्ना वर शेती खर्चा नुसार भाव मिळत नाही. दूसरी कडे निसर्गाच्या मारा मुळे हा शेतकरी संकट आला आहे. आणि आता खता च्या वाढत्या किमती मुळे हा शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगाम च्या वेळी खताच्या वाढत्या भावा मुळे त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
१०.२६.२६ या खतांची किंमत १४७० होती आता ते १७०० झाले आहे. २४.२४.०० ची किंमत १५५० होती आता १७०० झाली. २०.२०.००.१३ चे १२५० होती आता १४५० झाले आणि सुपर फॉस्फेट जे ५०० मध्ये मिळत होते ते आता ६०० मध्ये मिळत आहे. या प्रकारे खताच्या किमतीत १०० ते ३०० पर्यंत वाढ झाल्याने त्याचे उत्पादन मूल्य देखील वाढले. शासन एक तर उत्पादन मुल्या वर आधारित भाव देत नाही आणि दूसरी कडे खत, बी बियाणे आणि अन्य शेती ला आवश्यक साहित्या च्या कीमती वर नियंत्रण नाही ठेवत. शासन च्या या दुटप्पी नीति मुळे शेतकऱ्यांना शेती करणे कठीण नव्हे तर अशक्य होत असल्याचे दुदैवी चित्र आहे.

