अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील नगाजी पारडी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे आपसी वादातून एकाने दुसऱ्यावर सब्बलीने वार करुन गंभीर जखमी केले असून जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारा करिता सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार मंगळवारी ७ मे ला सकाळी ९ वाजताच्या सुमारास नामदेव शामराव कोरडे राहणार नगाजी पारडी हा गावातील पानटवरीवर बसून असतांनाच आरोपी श्रिकांत वासुदेव गावंडे हा सब्बल घेऊन आला व त्याने नामदेव शामराव कोरडे यांच्या डोक्यावर सब्बलीने सपासप वार केले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या नामदेव कोरडे याला तातडीने उपचारासाठी हिंगणघाट येथिल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढिल उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले.
नेमका हा वाद कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकले नसुन पुढील तपास हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या प्रभारी ठाणेदार वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.

