हिंगणघाट शहरात मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच करण्याची मागणी. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे म्हणून नागरिकांनी शेकडो दिवस विविध आंदोलने केली. अखेर या आंदोलना पुढे राज्य सरकारला झुकावे लागले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या नागपुर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय होणार अशी घोषणा केली. मात्र शहरातील अनेक ठिकाणी जागेची पाहणी करण्यात आली पण अजून पर्यंत जागे संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हिंगणघाट वैद्यकीय महाविद्यालय बाबत गंभीर आरोप केले आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक भूमिका घेत आरोपी केले आहे. मेडिकल कॉलेज वर्धेच्या दिशेने पळवण्यासाठी घात घातला जात आहे. यात या राजकीय नेत्याने व या राजकीय नेत्याच्या अवतीभवती असलेल्या धनदांडग्या व्यावसायिकांनी या साखर कारखान्या परिसरातील अनेक शेती विकत घेतली आहे. मेडिकल कॉलेजसाठी थोडीफार जमीन देऊन शेकडो एकर जमिनीचे भाव दहा पट वाढवीत करोडो रुपयांचा नफा कमवण्याचा मानस या असल्या बिल्डर नेत्याकडून व एका मोठया उद्योजका कडून केला जात आहे.
यामुळे हिंगणघाट शहरातील जनतेच्या आंदोलनाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून व असल्या उद्योजक व राजकीय नेत्याच्या मनसुभ्यावर पाणी फेरण्याच्या दृष्टिकोनातून आपण कठोर पावले उचलणे महत्त्वाचे आहे. हिंगणघाट शहरात मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरात व हिंगणघाट शहरा नजीक असलेल्या दोन तीन किलोमीटर परिसरात उभारण्यात यावे अशी आमची मागणी आहे. आर्थिक दृष्ट्या मोठा फायदा करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू असलेला या बिल्डर नेत्याचा व त्याच्या सहकारी उद्योजकाचा हा प्रयत्न पूर्ण होता दिसल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
हिंगणघाट शहरात मंजूर झालेले शासकीय वैद्यकिय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच निर्माण व्हावे व तात्काळ करण्यात यावे असे अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉग्रेस तर्फे करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव प्रशांत लोणकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुशील घोडे, जिल्हा सचिव नितेश नवरखेडे, समुद्रपूर तालुका अध्यक्ष तुषार थुटे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष रवी कुटे, जिल्हा सचिव शेखर ठाकरे, तालुका उपाध्यक्ष पंकज भट्ट, ओबीसी शहराध्यक्ष अमोल भिषेकर, संचिन घोडे, शहर उपाध्यक्ष साहील चौधरी, अमित रंगारी, रवींद्र बोरकर, राकेश शेंडे, शेख नईम, नदीम अली, रवी मेसेकर, निखिल ठाकरे, राहुल बोरकर, विपुल थुल, आदित्य बूटे, गोपाळ गुळघाणे, कुणाल येसम्बरे, गौरव वानखेडे, रेहान पठाण, विपुल वाढई, भारत बावणे, वैभव भुते, रोशन निशाणे, आदी पदाधिकारी उपस्थित होते

