✒️प्रविण जगताप, प्रतिनिधी
नागपूर:- अनेक दिवसापासून पोलिस भरती शासना तर्फे घेण्यात आली नाही. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या अनेक तरूनात नेराश्य निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक उमेदवारीचे वय मर्यादा संपण्याच्या मार्गावर आहे.
आज नांदेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी पोलिस भरती झाली पाहिजे, अशा घोषणा देत गोंधळ घातला. रखडलेल्या भरती झाली पाहिजे, अशी मागणी देत विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्याने गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याने पोलिसांनी याठिकाणी घोषणाबाजी करणाऱ्या युवकांवर सौम्या लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना घेराव घातल्याचे पाहायला मिळाले. शिवाय, घोषणाबाजी केल्याचेही पाहायला मिळत आहे. गोंधळानंतर विद्यार्थ्यांना न भेटून काहीही न बोलताच देवेंद्र फडणवी पुढे रवाना झाले.

