पंकेश जाधव . पुणे जिल्हा प्रतिनिधी
गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभाग, पुणे शहर
दि. १५/०९/२०२२ रोजी Sex TANTRA SATYAM SHIVAM SUNDARAM FOUNDATION +91-898 3312-101 PUNE Maharashtra CAMP DATE-01,02,03 October Navratri Special CAMP COURSE 3 Days, 2 Night Fee-15,000/- Rs per person including food and accommodation (No any extra charges) अशी जाहिरात समाज माध्यम व्हाट्सअॅपवर प्रसारीत झाल्याने वरीष्ठांचे आदेशाने सदर बाबत सामाजिक सुरक्षा विभागा मार्फत संबंधीत सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशन बाबत माहिती घेतली असता सदर जाहीरात ही इंग्रजी भाषेमध्ये छापलेली असुन त्यात अश्लिल छायाचित्रे छापलेली दिसत आहेत. अशा प्रकारची जाहिरात झाल्याने मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर यांनी सदर जहिरातीची चौकशी करून कायदेशिर कारवाई करणे बाबत सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर यांना आदेशित केले.
त्या अनुषंगाने सामाजिक सुरक्षा विभागाने सदर समाज माध्यमावरील जाहीरातीचा शिताफीने व सखोल तपास करुन त्यामधील फोन नं. प्राप्त केला व दि. १५/०९/२०१२ रोजी जाहिरातीमधील फोन नंबर पर व्हाटसअप द्वारे संपर्क साधला असता संबंधीत व्यक्तीने आपले नाव रवि प्रकाश सिंग, रा. प्रयागराज राज्य उत्तरप्रदेश अरो असुन सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशन उत्तर प्रदेश याठिकाणी रजिस्टर केले असल्याचे सांगीतले तसेच सदर जाहीरात ही त्यानेच केली असल्याबाबत परिपुर्ण खात्री झाल्याने सदर इसमाने अश्लिल नावाने जाहीरात तयार करुन व्हाटसअप व इतर सोशल मिडीया या इलेक्ट्रॉनीक्स माध्यमांद्वारे प्रसारीत केली. सदर जाहीरातीमध्ये अश्लिल फोटो छापुन जाहीरातीद्वारे अश्लिल फोटोचे जाहीर प्रदर्शन तसेच प्रसारण केले म्हणुन त्याचे विरुद सामाजिक सुरक्षा विभागाकडील महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे यांनी सरकारतर्फे भा. दं. सं. कलम २९२ सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिल्याने सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
दाखल गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती भाग्यश्री नवटक्के, पोलीस उप आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे मार्गदशनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, सायबर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. श्रीनिवास घाडगे पोलीस उप आयुक्त गुन्हे, यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री विजय कुंभार तसेच पोउपनि सुप्रिया पंढरकर पोलीस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण, मनिषा पुकाळे, राजेंद्र कुमावत, निलम शिंदे यांनी केली आहे.

