विठ्ठल ठोंबरे, प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जामनेर :- तालुक्यातील वाघूर नदी मधील स्मशानभूमी जवळ बेकादेशिर पणे झालेले अतिक्रमण लोकशाही मार्गाने काढण्यासाठी सुकलाल बळीराम बारी रा. संतोषीमाता नगर,पहूर पेठ,ता जामनेर, जि.जळगाव यांनी गेली कित्येक वेळा ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन पहूर, पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांना वारंवार निवेदन देऊनही हे अतिक्रमण काढत नसल्याने आज दि. १८ जून रोजी पासून पहूर बस स्थानक येथे बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे. याआधी देखील प्रशासनास निवेदनामार्फत कळविले असता कोणतीही अंमलबजावणी झाली नाही.
श्री क्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिरासमोरील हिंदू स्मशानभूमी जवळ झालेले अतिक्रमण काढावे तसेच स्मशानभूमी लगत असलेले कोंबडी फार्म देखील काढण्यात यावे. स्मशानभूमी मध्ये येणाऱ्या लोकांना या कोंबडी फार्मच्या दुर्गंधी मुळे जास्त त्रास सहन करावा लागत आहे. या उपोषणास पहूर नागरिकांचा अतिक्रमण काढण्यात बाबत मोठ्या संख्येने पाठिंबा मिळाला आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकरच आमच्या मागण्या मान्य कराव्या असे उपोषण कर्त्यांची मागणी आहे.
यावेळी उपोषणकर्ते सुधाकर शिनगारे (अखिल भारतीय अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना जळगाव जि. अध्यक्ष ), सुकलाल बारी,भावराव गोंदनखेडे,सुनील सोनार,दिलीप पांढरे, विजय देशमुख, ज्ञानेश्वर घोलप आदि उपोषणकर्ते उपस्थित होते.

