आधार फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी वडाचे वृक्ष लावून साजरी केली जाते वटसावित्री.
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आधार फाउंडेशनच्या महिला मंचाच्या वतीने दरवर्षी वटवृक्ष लावून वटसावित्री साजरी केली जाते. यावर्षी स्थानिक यशवंत नगर येथील हनुमान मंदिर परिसरामध्ये अँड. प्रतिभा भानखेडे, सौ.रिता पुसेदकर यांच्या शुभहस्ते वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. वटवृक्ष लावणे ही काळाची गरज ओळखून दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. आतापर्यंत लावलेल्या अनेक वडा च्या रोपाचे वृक्षामध्ये रूपांतर झालेले आहे.
वडाच्या वृक्षाला अक्षय वृक्ष म्हणतात या वृक्षाचा कधीही क्षय होत नाही. तो सतत वाढत जातो त्याच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा उगवतात. त्याचा विस्तार होतो व त्याला उदंड आयुष्य लाभते. त्याचा विशाल आकार व भरपूर पाणी असल्याने तो अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सदापर्णी वार्षिक वृक्ष वटवृक्ष होय. हा महाकाय वटवृक्ष थंड व सर्वाधिक प्राणवायू देणारा आहे. त्याची सालं आणि मूळ सुद्धा अतिशय गुणकारी मानली जातात. त्यामुळे परंपरा व पर्यावरण सांगड घालून वटवृक्षाचे रोपण त्याच्या संवर्धनाचे काम आधार फाउंडेशनच्या महिला मंचाने हाती घेतलेलं काम मागील सात वर्षापासून शहरामध्ये विविध जातीच्या वृक्षाचे रोपन करून तसेच वृक्ष वाटप करून केले जाते. आज पावतो शेकडो वृक्षाचे वाटप तसेच त्यांच्या संवर्धनाचे कार्य आधार फाउंडेशन कडून होत आहे. परंपरा व पर्यावरण गुंफण करत त्याचे वटवृक्षारोपण हा अतिशय स्तृत्य उपक्रम फाउंडेशनच्या महिला मंचाकडून राबविला जातो. आपआपल्या परिसरात देखील मोठया प्रमाण मध्ये वृक्षारोपण करा असे आवाहन देखील आधार फाउंडेशन च्या वतीने केले आहे.
या वटवृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे संचालन वीरश्री मुडे तर आभार कविता घोडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.माधुरी विहीरकर, माया चाफले, ज्योती धार्मिक, अनिता गुंडे, स्वाती वांदीले, वैशाली लांजेवार, छाया सातपूते, सुमन डांगरे, किरण निमट, मयुरी देशमुख, विजया रिठे, मालती हिवरकर, जोत्स्ना बावणे, मीनाक्षी फुलबांदे, डॉ.प्रियंका बोंडे, रश्मी धायवटकर, कविता बोरकर, वैशाली हेडावू, नीता वांदिले, ज्योती साबळे, उषा गावंडे, माधुरी कावरे, सीमा तिवारी, सुचिता सातपुते, वर्षा सोनटक्के, राधा पादाडे, निधी दाधगाये, नंदा पारीसे, सोनू गजभिये, उमा नगराळे, मोनाली मॅडमवार, वृशाली गुंडावार, निता घोडे, वैशाली सायंकार, शुभांगी कारामोरे, अर्चना कारामोरे, प्रिती कलोड़े, माधुरी कारामोरे, सविता कारमोरे, शितल चंदनखेडे, भोसले मॅडम, पावडे मॅडम आदीने सहकार्य केले.

