अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक रा. सु. बिडकर महाविद्यालयात जागतिक योग दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलंन करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरपरिषद अध्यक्ष प्रेम बसंतांनी होते तर मुख्य अतिथी म्हणून रा. सु. बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर आणि सौ. कुणावारची उपस्थिती होती. यावेळी योग शिक्षक दामोधर राऊत यांनी योगासने व त्याची महत्त्व यावर मार्गदर्शन केले. अल्पोहरा नंतर कार्यक्रम संपला.
या कार्यक्रमाचे आयोजन पतंजली परिवार, रा. सु. बिडकर महाविद्यालय आणी इंनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. रुपेल कोठारी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री वसंत पाल, सुकंतवार, दविले सर, तसेच पतंजली चे सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विध्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

