मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाटः- तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साठी चांगलेच वातावरण तापले असताना एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. हिंगणघाट येथे प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाकरीता मल कन्स्ट्रक्शनने वेळा येथील 40 एकर जागा दान दिलेल्या प्रस्ताव सदर केला. त्या जागे संदर्भात मोठा खुलासा झाला आहे.
वेळा या गावात जवळपास 180 एकर परिसरात स्व. बापुरावजी देशमुख सहकारी साखर कारखाना हा मल कन्स्ट्रक्शन प्रा. लि. नागपूर तर्फे अजय दाऊदयाल मल यांनी खरेदी केली. यापैकी 40 एकर जागा ही हिंगणघाट येथे प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाकरीता 1 रुपयात दान देण्याची त्यांची तयारी दर्शवली. त्यामुळे हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात विरोध सुरू असताना आमदार समीर कुणावर यांनी पण वेळा येथेच वैद्यकीय महाविद्यालय होणार अशी गर्जना केली. पण मल कन्स्ट्रक्शनच्या या भुमापन क्रमांक 455 या जागेवर वर कोट्यवधीचे कर्ज असून शासन आणि अनेक बँकेचा बोजा सात बारा वर चढून असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आवळा देऊन कोवळा काढायचा तर मल कन्स्ट्रक्शन या कंपनीने हा अट्टाहास केला नसेल ना?.
मल कन्स्ट्रक्शन कंपनीवर कोट्यवधीचा बोजा.
मल कन्स्ट्रक्शन कंपनीवर सहकारी सोसायटी को-ऑप बँकचा 15,40,00000 कोटी रुपये, असिस्टंन कमिश्नर ऑ सेल्स टॅक्स विभागाचा 2,61,83,270 कोटी रुपये, शासनाचे शासकीय अर्थ सहाय्य विभाग 2074.13 लाख, मा. तहसीलदार हिंगणघाट दिनांक 24/4/2018 पत्रानुसार 1420, मा. तहसीलदार हिंगणघाट यांचे पत्र क्र./मह. सहा./ववान/कावि 760 / 2021 दिनांक 15/7/ 2021 विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था (साखर) वर्धा 28/06/2021 रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 155 अन्वये शासकीय बोजा रुपये 36.35 लाख रुपये बोजा असून ही जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्यासाठी मल कन्स्ट्रक्शन कंपनी का बर राजी झाली ते सर्व यात लपून आहे.
शासनाचा आणि इतर बँकेचा या जागेवर कोट्यवधीचा बोजा चढलेला आहे. त्यापासून बचावण्यासाठी मल कन्स्ट्रक्शन या कंपनीने वेळ साधून हा कार्यक्रम केला असे संपूर्ण हिंगणघाट तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात आमदार समीर कुणावर यांनी या जागेचा पत्रकार परिषदेत मोठा आग्रह केला आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वेळा येथील मल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जागेवर होणार असे जाहीर केल्याने त्यांच्या भूमिकेवर आज मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
संघर्ष समिती आणि नागरिकांचे आंदोलने: वर्धा जिल्ह्याला मिळालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे बनण्याचा निर्णय झाल्यानंतर 40 एकर शासकीय जागेची शोध मोहीम शासन व प्रशासन स्तरावर सुरू झाली. याच दरम्यान वेळा येथील साखर कारखाना विकत घेणाऱ्या मल कंस्ट्रक्शनने 1 मार्च 2024 वेळा येथील 182 एकर पैकी 40 एकर जागा फक्त वैद्यकीय महाविद्यालयासाठी केवळ एक रुपयात दान देण्यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हिंगणघाट तहसीलदार यांच्या कडून अहवाल मागवून तो प्रस्ताव शासनाकडे पाठविला. ही बाब पुढे आल्यावर संघर्ष समितीने व प्रामुख्याने विरोधी पक्षांनी गदारोळ उडवून यात दानदात्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही जागा दान दिली असुन आमदार समीर कुणावार यांचा यात सहभाग असल्याचा आरोप केला होता.

