✒️ मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबईः- येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईतील झोपडपट्टी परिसरात नकली नोटा छापन्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांनी सूत्रांकडून मिळाली होती. झोपडपट्टीमध्ये परिसरात एका खोलीत मोठ्या प्रमाणात 50, 100 आणि 200 रुपयांच्या नकली नोटा छापल्या जात होत्या. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच संबंधित घरावर छापा टाकला असता नकली नोटा बनवण्याचा कारखाना बघून पोलिसही चक्रावून गेले. त्यात नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आल्या आहेत. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 7 लाख 16 हजार 150 रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या गेल्या आहेत. याप्रकरणी आरोपी रोहित शहाला अटक करुन पुढील तपास चालू करण्यात आला आहे.
नकली नोटाचा कारखाना प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी रोहित शहा यांचे वय 22 वर्षे असून याप्रकरणी आणखी कोणी त्यामध्ये सामील आहे का याचाही शोध घेतला जात आहे.