मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी:- तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय नागेपली अंतर्गत येत असलेल्या पुसुकपली येते १५ व्या वित्त जिल्हा परिषद स्तर गडचिरोली अंतर्गत शुद्ध पिण्याचं पाण्याची जलशुद्धिकरण केंद्र मंजूर करण्यात आली.सदर बांधकामाच्या भूमिपूजन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पुसूकपली येते गढुळ पाणी असुन अनेक नागरिकांना आजार झाले होते. मात्र गावातील नागरिकानी सुध्द पिण्याचं पाणी मिळावे म्हणून जि.प.माजी अध्यक्ष यांच्या कडे मागणी केली असता जिल्हा परिषद गडचिरोली १५ व्या मधून निधी मंजूर करण्यात आले असुन भूमिपूजन सम्पन्न झाली आहे. यावेळी नागेपलीचे सरपंच श्री.लक्ष्मण कोडापे,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे, अहेरीचे स्वीकृत नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार, ग्राम पंचायत सदस्य श्री.रेड्डी सावकार, ग्राम पंचायत सदस्य श्री.राकेश कूळमेथे, शेवंता भोयर, शा.व्य.स.अध्यक्ष श्री.रामदास चौधरी, श्रीनिवास भोयर, सुरेश चौधरी, शामराव डोके, रमेश भोयर, प्रमोद भोयर, शंकर अत्कूलवार, व्येंकटेंश रेगुंडी, गंगाराम येलूर, प्रमोद गोडसेलवार गावातील महिला व नागरिक उपस्थित होते.

