पंकेश जाधव . पुणे जिल्हा प्रतिनिधी
गुन्हे शाखा युनिट -०५. पुणे शहर
तुषार हंबीर, वय-३५ वर्षे रा. गोंधळेनगर, हडपसर, पुणे हा लोणी काळभोर पो स्टे चे मोक्का कैसचे गुन्हया मध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे असताना त्यास उपचारकामी ससून हॉस्पीटल पुणे येथे अॅडमिट करणेत आले होते. दिनाक ०५/०९/२०२२ रोजी प्रकाश दिवाकर, सागर ओव्हाळ, बालाजी ओव्हाळ, नोन्या उर्फ प्रतिक कांबळे, त्रतिक उर्फ बबलु राजु गायकवाड, साहील इनामदार इत्यादी आरोपी यानी तुषार हंबीर याचेवर हल्ला करून त्यास जीवे ठार मारणेचा प्रयत्न केला होतो. त्या अनुशंगाने बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. २४०/२०२२. भा. दं.वि. कलम ३०७, ३५३,३३२, १२०(ब) १४१, १४३, १४४, १४७, १४८. १४९, आर्म अॅक्ट ३ (२५), ४(२५), क्रिमीनल लॉ अॅमेंटमेंट अॅक्ट ३,७ मपोका ३७ (१) (३) १३५ अन्वये गुन्हा नोंद आहे. दाखल गुन्हयातील प्रत्यक्ष हल्ला करणारे मुख्य आरोपी प्रकाश दिवाकर व साहील इनामदार हे गुन्हा
दिनांक १७/९/२०१२ रोजी युनिट-०५, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग फिरत असताना पोलीस अमलदार यांना बातमी मिळाली की दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपी प्रकाश दिवाकर व साहील इनामदार हे दोघे मिगनगर उत्तमनगर पुणे येथे आलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन त्या भागात सापळा लावुन कोटेश्वर चौक, वीर अभिमन्यु मित्र मंडळा जवळ, कोंडवे, उत्तमनगर पुणे येथे ते दोघे थांबलेले मिळुन आल्याने १) प्रकाश उर्फ वैष्णव रणछोडदास दिवाकर, वय-२६ वर्षे, रा. वीर अभिमन्यु मित्र मंडळा जवळ, भिमनगर, उत्तमनगर, पुणे २) परवेज उर्फ साहिल हैदरअली इनामदार, वय २१ वर्षे, रा. तिरंगा चौक, गल्ली नं.७. आदर्श नगर, जे. एस. पी. एम. कॉलेजच्या मागे, ऊरळी देवाची, पुणे यांना जागीच पकडून, त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने तपास करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना दाखल गुन्हयात ताब्यात घेवुन त्याची ससुन हॉस्पीटल, पुणे येथे वैद्यकिय तपासणी करुन त्यांना बंडगार्डन पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे. यापुर्वी देखील दाखल गुन्हयातील मुख्य सुत्रधार प्रतिक ऊर्फ नान्या संजय वाघमारे, वय २२ वर्षे, रा. शांतीनगर वसाहत, बनकर कॉलनी, आकाशवाणी समोर हडपसर, पुणे व त्याचा साथीदार ऋतिक उर्फ बबलू राजु गायकवाड, वय १९ वर्षे, रा. शांतीनगर वसाहत, बनकर कॉलनी, आकाशवाणी समोर, हडपसर, पुणे यास युनिट-०५, गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त श्री श्रीनिवास घाडगे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, अकबर शेख, दयाराम शेगर यांनी केली आहे.

