✒️वैशाली गायकवाड, पुणे प्रतिनिधी
पुणे:- पुण्यातील इतिहासिक भिडे वाडा बचाव बाबत सावित्रीच्या लेकीचा एकाटल्या असून त्यांनी शिक्षणाचं माहेर घर वाचलं पाहिजे म्हणून एल्गार पुकारला आहे. आज भिडे वाडा बचाव मोर्चा काढण्यात आला होता त्यात हजारोच्या संख्येने महिला सहभागी होऊन शासनाचा निषेध केला. मागील असेल वर्षा पासून कित्येक सरकारे आली आणि गेली पण कोणत्याही सरकार महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेली मुलीची पहिली शाळा असलेल्या भिडे वाड्याकडे लक्ष दिले नाही आज हा वाडा पुर्णत खंडर झाला असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासना विरोधात सावित्रीच्या लेकीनी एल्गार पुकारला आहे.
राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार आले की, आम्ही शिवाजी, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे महाराष्ट्र असे मिळवत असतात पण त्याच्या कार्य समाजात पोहचवण्यासाठी कुठलेही कार्य करताना दिसून येत नाही हेच महाराष्ट्राची शोकांतिका म्हणावी लागेल. शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले घ्या की महात्मा फुले यांनी काढलेल्या पहिली शाळा भिडे वाडा घ्या याकडे ये सरकार कायम दुर्लक्ष करत आली आहे.
सर्व जाती धर्माच्या महिलांना शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केली. हा भिडे वाडा म्हणजेच शिक्षणाचे मंदिर असून आज त्याची अवस्था जीर्ण झाली आहे. घरोघरी शिक्षणाच्या ज्योती पेटवणारा हा भिडे वाडा आज खंडर बनला आहे.
भिडेवाड्यात मुलीची पहिली शाळेची स्थापना करणाऱ्या ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले त्यांना मागासवर्गीय म्हणून हिणवले जात होते. त्यांना सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्याही वंचित ठेवले जाई. सावित्रीबाईंनाही केवळ स्त्री असल्यामुळे नाही, तर जातीपाती मुळे देखील औपचारिक शिक्षण नाकारले गेले. घरी शिक्षण देणाऱ्या त्यांच्या पतीकडून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्या स्वतःच शिक्षिका बनल्या. शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका होणारी ती पहिली भारतीय महिला होती. त्यानंरत या भिडे वाड्यातून एक नव क्रांतीची मशाल पेटली आणि आज ज्या महिला शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान झाल्या आहेत ते याच क्रांतीची बळावर त्यांनी ही मजल गाठली आहे.
पुण्यातील भिडे वाड्यातील शाळा उघडणे त्याकाळी बर्याच अर्थाने क्रांतिकारी होती. त्या काळाच्या सामाजिक व्यवस्थेला आव्हान देणारी होती. पण आज दुःख असे की ही इमारत जीर्ण अवस्थेत आहे. ते राष्ट्रीय स्मारक व्हावे म्हणून सावित्रीच्या लेकी एकटल्या आहे. मुखं मोर्चा कडून जोरदार निदर्शने केली आहे.
भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याच्या मागणीसाठी आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी “भिडे वाडा वाचवा’ मोहीम सुरू झाली असून, सरकारला हे राष्ट्रीय स्मारक करण्याचे आवाहन केले जात आहे.

