भाजपा कामगार मोर्चा राजुरा तर्फे जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदनाद्वारे मागणी.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 6 ऑगस्ट:- भाजपा कामगार मोर्चा तालुका राजुरा तर्फे जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन शिष्ट मंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. राजुरा उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य अधीक्षक डॉ. मुणेश्वर भोंगाळे यांची प्रभारी तत्वावर नियुक्ती केलेली आहे. परंतु राजुरा उपजिल्हा रुग्णालय येथे नियमित गैरहजर राहत असून त्यांचे वास्तव्य भंडारा येथे आहे. राजुरा उपजिल्हा येथे रुजू झाले तेव्हापासून सुट्या वर गेले आणि अजून प्रयन्त आले नाही. सामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपचाराचा अभाव व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हजर असलेले कर्मचारी रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांना उद्धट वागणूक देत आहे त्यामुळे अनेकांची हाल अपेष्टा होत असून अनेक रुग्णांना उपचाराभावी रेफर टू चंद्रपूर केले जात असून बऱ्याच जणांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, लवकरात लवकर नियमित आरोग्य अधिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे यांनी निवेदनाद्वारे शिष्टमंडळा सोबत केली.
अन्यथा भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा द्वारे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे दिला.
यावेळी उपस्थित भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, माजी किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजू घरोटे, जनार्धन निकोडे, संजय जयपुरकर, राजू गैरशेट्टीवार उपस्थित होते.

