नितेश पत्रकार, झरि तालुका प्रतिनिधी
मो. न,7620029220
यवतमाळ:- .जिल्हातील झरि येथील “जुनी पेन्शनच्या मागणीसाठी सर्व विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी झरीमध्ये बाईक रॅली काढली. भगवान बिरसा मुंडा चौक झरी पासून बाईक रॅलीला सुरुवात झाली आणि सर्व प्रमुख कार्यालयाच्या समोरून जाऊन बाईक रॅलीचा शेवट तहसील कार्यालय झरी येथे झाला.
2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे. सर्व विभागातल्या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजने ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी वेगवेगळे आंदोलन केले आहेत. भविष्यामध्ये बेमुदत संपाची तयारी सर्व विभागातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेली आहे, त्याची पूर्वतयारी म्हणून ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती.
या बाईक रॅलीला श्री. मोहन काटकर यांनी संबोधित करून संपासाठी सर्व विभागातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी तयार राहावे असे आवाहन केले. यावेळेस अनिल चिंतकुटलावार, राजू मसराम यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन बाईक रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळेस झरी तालुक्यात कार्यरत शिक्षण विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, कर्मचारी मध्यवर्ती संघटना, ग्रामसेवक संघटना, सर्व शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, तलाटी संघटना, आरोग्य सेवक संघटना, कॄषी सेवक संघटना, भुमी अभिलेख, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी, खाजगी शिक्षक संघटना व ईतर विभागातील सर्व संघटनेचे जवळपास 200 कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

