*स्पर्धेचे परीक्षण म्हणून एम, मडावी यांनी उपस्थित होते*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
आज दिनांक 05 ऑक्टोबर 2024 रोज शनिवार ला, आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन, आल्लापल्ली तथा राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली द्वारा वीरांगना राणी दुर्गावती जी मडावी यांच्या 500 व्या जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तेंव्हा वक्तृत्व स्पर्धेचे विषय – वीरांगना राणी दुर्गावती यांचे जीवन चरित्र हे होते. स्पर्धे मध्ये 5 शाळेतील, एकूण 25 विद्यार्थ्यांनी भाग घेऊन वीरांगना राणी दुर्गावती जी मडावी यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत आपापले मत व्यक्त केले. स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून मा. श्री. एम. मडावी सर (जि. प. शाळा, मरपल्ली) व मा. श्री. पी. तलांडे सर (सामाजिक कार्यकर्ते (दिनाचेरपल्ली) नागेपल्ली ह्यांनी कारभार सांभाळून निकाल जाहीर केला, त्यापैकी तृतीय क्रमांक – कु. जान्हवी मारकवार, राणी दुर्गावती विद्यालय, आल्लापल्ली, द्वितीय क्रमांक – कु. खेमा जुनगरे, राणी दुर्गावती विद्यालय, आल्लापल्ली, व प्रथम क्रमांक – कु. सानिका करपेत, (ग्रीनलँड इंग्लिश मिडिअम स्कुल, आल्लापल्ली) हिने पटकवला. त्यावेळी स्पर्धे करिता रोख पारितोषिक व प्रमाणपत्र तृतीय क्रमांकाकरिता, 501 रु. आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन, आल्लापल्ली यांचे मार्फत होते, द्वितीय क्रमांकाकरिता, 1001 रु. मा.श्री. प्रितम भाऊ गग्गुरी, उपसंपादक इंडिया दस्तक न्यूज टिव्ही यांचे मार्फत होते तर प्रथम क्रमांकाकरिता, 1501 रु. मा.श्री. लोणबले सर, (प्राचार्य) राणी दुर्गावती विद्यालय, आल्लापल्ली यांचे मार्फत व तिन्ही क्रमांकाकरिता शिल्ड- श्री प्रतिक गेडाम (सामाजिक कार्यकर्ते) आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन, आलापल्ली यांचे तर्फे ठेवण्यात आले होते. व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर भेट वस्तू आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन, आल्लापल्ली यांचे तर्फे देण्यात आले. तेंव्हा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. मेश्राम सर, (प्राचार्य) सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय (वेलगुर) आल्लापल्ली, सहअध्यक्ष म्हणून मा. आत्राम सर, प्रतिष्ठित नागरिक आल्लापल्ली, प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. ईश्वरजी वेलादी, प्रतिष्ठित नागरिक आल्लापल्ली, मा.श्री. प्रभाकरजी आत्राम,प्रतिष्ठित नागरिक आल्लापल्ली, मा.श्री. मुरलीधरजी सडमेक, प्रतिष्ठित नागरिक आल्लापल्ली, मा.श्री. जगाजी आत्राम, प्रतिष्ठित नागरिक मोदुमडगू, श्री. संजु भाऊ आकेवार, सामाजिक कार्यकर्ते आल्लापल्ली, श्री. मनोज भाऊ सडमेक, सामाजिक कार्यकर्ते आल्लापल्ली, श्री. उमेश भाऊ आत्राम, अध्यक्ष- आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन, आल्लापल्ली, श्री. स्वरूप गावडे सर, मुख्याध्यापक, इंस्पायर कॉन्व्हेंट, आल्लापल्ली, मा.श्री. प्रितम भाऊ गग्गुरी, उपसंपादक इंडिया दस्तक न्यूज टिव्ही तसेच राणी दुर्गावती विद्यालय, आलापल्ली व सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय आल्लापल्ली येथिल समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आदिवासी लोकसेवा फाऊंडेशन चे सदस्य गण सुरज मडावी, तिरुपती वेलादी, महेश मेश्राम, नोमेश आलाम, राकेश आलाम, रवि टेककाम, श्रवण उरेत, साहिल लोणारे, समीर बावणे, दिपक मडावी, अमर मेश्राम, शुभम मडावी, हर्षल कोरेत, रुपेश आत्राम, प्रतिक गेडाम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री. माहुलीकर सर (शिक्षक) राणी दुर्गावती विद्यालय आल्लापल्ली, यांनी केले व कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मा.श्री. स्वरूप गावडे सर, मुख्याध्यापक, इंस्पायर कॉन्व्हेंट, आल्लापल्ली यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत होऊ घातलेल्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आले… तेव्हा मोठ्या प्रमाणात महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

