गुणवंत कांबळे, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- जीवन गौरव समाजभूषण पुरस्कार सोहळ्यानिमित्त स्पंदन थिएटर्स आणि बोधिवृक्ष फाऊंडेशन निर्मित एक महानाट्य “देवानंपिय असोक” या नाटकाचा पत्रकार युवराज मोहिते, शाहीर संभाजी भगत, निर्माता चंद्रकांत जगताप, राजेंद्र ससाणे यांच्या हस्ते पोस्टर अनावरण सोहळा शुक्रवार, दिनांक ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी, रात्री नऊ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला.
यावेळी लेखक, दिग्दर्शक उदय जाधव, पार्श्वगायक, संगीतकार प्रवीण डोणे, वेशभूषाकार मंदार तांडेल, कलाकार प्रितेश मांजलकर आणि देवानंपिय असोक या नाटकातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.नाटकाचे निर्माते आहेत चंद्रकांत जगताप आणि राजेंद्र ससाणे,तर लेखन आणि दिग्दर्शन केलंय ते उदय जाधव यांनी. लवकरच हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर दाखल होत आहे. त्यामुळे सर्व रसिक वर्गाच्या या नाटकाकडे लक्ष लागले आहे.

