धाबा वनाधिकाऱ्यामार्फनी डिएफओंना पाठविले निवेदन.
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी 9518368177
गोंडपिपरी:- तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे.अश्यावेळी वनालगत गावातील शेतपिकांचे प्राण्यांकडून नासधूसाच्या घटना दररोजच्या आहेत.यावर मात करण्यांसाठी म्हणून डाॕ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेअंतर्गत वनालगत गावांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. हा निधी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून खर्च करावयाचे धोरण आहे.मात्र तालुक्यातील वनसमित्यांना विश्वासात न घेता वरिष्ठांकडून समितीचे कार्य हाताळल्या जात आहे.हा प्रकार वन समितीच्या अधिकारांवर गदा आणणारा आहे.यामूळे हा गंभिर प्रकार थांबवावा, यासाठी तालुक्यातील वन समित्यांच्या अध्यक्षांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी निवेदन देत वनसमित्यांमध्ये वरिष्ठ पातळीवरुन होणारा हस्तक्षेप थांबवावा असे म्हणत आपल्या मागण्यांचे निवेदन वनविभागाला सोपविले आहे.
गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. वन्यजीवांची सख्या देखिल लक्षणीय आहे. अश्यातच वनालगत असणाऱ्या गावात शेतपिकांची नुकसान ही नित्याचीच बाब झाली आहे. आधिच अस्मानी आणि सुल्तानी संकटात सापडलेल्या बळीराज्याला आता वन्यप्राण्यांची भिती सतावत आहे. असे असतांना डाॕ.सामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेअंतर्गत वनालगत गावांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचे रक्षण करणे, हा हेतू केंद्रस्थानी ठेवून गावोगावच्या वनसमित्या कार्यरत आहेत.या समित्या अंतर्गत असलेला निधी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून खर्च करावयाचे धोरण आहे. मात्र तालुक्यातील वनसमित्यांना विश्वासात न घेता वरिष्ठांकडून समितीचे कार्य हाताळल्या जात आहे. गोंडपिपरी तालुक्यातील बऱ्याच गावात वरिष्ठ पातळीवरुन “ई-लर्निंग संच”,सोलर पोल लावले जात आहेत. यात वनसमित्यांना विश्वासात घेतले जान नसल्याने वनसमित्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. गावपातळीवरील वनसमित्यांना विश्वासात न घेता कामे होत असतील तर समित्यांचा उपयोग काय ? असा प्रश्नही यावेळी वनसमितीच्या अध्यक्षांनी उपस्थित केला. वनविभागातील वरिष्ठ पातळीवरुन वनसमितीच्या अधिकारामध्ये होणारा हस्तक्षेप थांबवावा, असे म्हणत आपल्या मागण्यांचे निवेदन वनविभागाला दिले आहे. यावेळी धाबा वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या मार्फतीने मध्यचांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी तालुक्यातील बऱ्याच गावच्या वनसमित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.

