✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. प्रेमीकेने बरोबर यायला नकार दिल्याने प्रियकराने आपल्याच प्रेमिका आणि तिच्या आईवर जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ठाणे शहरातून समोर आली आहे. सुरेश रामदास वाडेकर असे हल्ला करणाऱ्या 22 वर्षीय प्रेमीचे नाव आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. आरोपीविरोधात कलम 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित 18 वर्षीय तरुणी, तिची आई आणि आरोपी तरुण सुरेश रामदास वाडेकर हा तरुणीच्या घोडबंदर येथील घरी राहत होते.
पोलिसांन कडून प्राप्त माहितीनुसार, बुधवारी शहरात जोरदार पाऊस पडत होता. यावेळी आरोपीने तरुणीला आपल्यासोबत आपल्या घरी येण्यास सांगितले. या तरुणीने सोबत येण्यास नकार दिल्याने तो तरुण संतापला. मात्र तरुणीने पावसात बाहेर पडण्यास नकार दिला. पाऊस थांबल्यानंतर जाऊन तरुणीने प्रियकराला सांगितले. यामुळे तो या तरुणीवर संतापला आणि त्याने तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. यावेळी तरुणीची आई मध्ये पडली असता आरोपीने तिच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी आणि तिची आई जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच शेजारी धावत आले. शेजाऱ्यांनी तात्काळ दोघी मायलेकींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.