रावेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन रावेर:- विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी वंचित बहुजन आघाडीच्या रावेर विधानसभा मतदार संघात उभे असलेल्या उमेदवार शमिभा पाटील यांच्यावर केलेल्या त्यांच्या ट्रान्सफोबिक टिप्पण्या आणि खोट्या आरोपांमुळे आम्ही पूर्णपणे नाराज आहोत. काँग्रेसने हा नवा नीचांक गाठला आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
“आता हिजडा निवडणूक लढवणार का?”, “आता हिजड्याला मत देणार का?”, “निवडणूक लढवायला हिजड्याला पैसे कुठून मिळतात?” हे काँग्रेस, त्यांचे उमेदवार आणि स्टार प्रचारक यांनी चालवलेले भेदभाव करणारे आणि ट्रान्सफोबिक शब्द आणि प्रचार आहेत! ही गोष्ट लज्जास्पद असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, मुख्य प्रवाहातील पक्ष केवळ दाखवण्यासाठी वंचित, शोषित समूहाचा समावेश करण्याबद्दल बोलतात. परंतु, केवळ वंचित बहुजन आघाडीने सातत्याने सर्वसमावेशक भूमिका घेतलेली आहे. सर्व शोषित, वंचित घटकांना समान संधी असली पाहिजे हाच वंचित बहुजन आघाडीचा हेतू आहे. त्यामुळेच पक्षात ट्रान्सजेंडरना प्रतिनिधित्व दिले आहे आणि निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. आमच्या जोशाबा समतापत्रामध्ये ट्रान्सजेंडर्सच्या कल्याणासाठी समर्पित एक विभाग आहे. दिशा पिंकी शेख या वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्ष, प्रवक्त्या आणि जाहीरनामा समिती सदस्यांपैकी एक आहेत.
वंचित बहुजन आघाडीने यावेळी एका ट्रान्सजेंडरला प्रतिनिधित्व आणि उमेदवारी दिली हे सत्य काँग्रेस पचवू शकत नाही. काँग्रेसच्या या कोत्या मानसिकतेची लाज वाटली असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सध्या, शमिभा पाटील, वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षा दिशा पिंकी शेख आणि कार्यकर्त्यांसह, काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांच्या घराबाहेर निदर्शने करत आहेत. काँग्रेसने शमिभा यांच्यावर केलेल्या घृणास्पद ट्रान्सफोबिक टिप्पण्या आणि खोट्या आरोपांसाठी जाहीर माफी मागावी या मागणीसाठी आमचे कार्यकर्ते निदर्शने करीत आहेत. आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून शमिभा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असल्याचेही आंबेडकर स्पष्ट केले आहे.
वंचित बहुजन आघाडी, रावेर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शमिभा पाटील यांनी शनिवारी (दि.१६) काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. काँग्रेसच्या सभेत शमिभा पाटील यांच्याबद्दल अवमानजनक आणि बदनामी करणारे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर शमिभा पाटील यांनी जाब विचारण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

