श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र शांततेत मतदान झाले असले तरी बीडमध्ये मतदानाला गालबोट लागलं आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर येथे काही हल्लेखोरांनी मतदान केंद्रात घुसून तोडफोड करण्यात करू ईव्हीएम मशीन फोडल्याच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प झाली आहे. 3 बूथवर तोडफोड झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबवली आहे. बन्सी शिरसाट या कार्यकर्त्याची गाडी सुद्धा फोडली आहे. दरम्यान, आज सकाळी याच मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाणीनंतर कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
बीडच्या परळी मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळाली होती. यानंतर शरद पवार गटाचे नेते माधव जाधव हे परळी मतदारसंघात बोगस मतदान रोखण्यासाठी गेले होते. मात्र माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली होती. चार ते पाच जणांनी जाधव यांना मारहाण केली होती.
गावात मोठा पोलीस तापा दाखल: बीडच्या परळी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी मारहाण केल्यानंतर घाटनांदुर गावात ईव्हीएम मशीन तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. नांदुरघाट मधील तीन आणि चोथेवाडी आणि मुरंबी गावात देखील मतदान केंद्रावर तोडफोड करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल चोरमले यांनी दिली. तसंच परिस्थिती नियंत्रणात असून धुडगूस घालणाऱ्यांना अटक केली जाईल, असं देखील सांगितलं.

