अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- संताजी जनसेवा मंडळ हिंगणघाटचे वतीने फेब्रुवारी 2025 ला सर्व शाखीय तेली समाज नियोजित वधु – वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आधुनिक काळात बदलत्या जीवनशैलीमुळे सामाजिक संपर्काचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे सुयोग्य वधु – वरांंची निवड करताना अनेक अडचणीचा सामना समाज बांधवांना करावा लागत आहे. त्यामुळे वधु – वर परिचय मेळाव्याचे आयोजन होणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.
हाच दृष्टिकोन पुढे ठेवून संताजी जनसेवा मंडळ हिंगणघाट चे वतीने येत्या फेब्रुवारी महिन्यात सर्व शाखीय वधु – वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गत दहा वर्षापासून सदर मेळाव्याचे नियमित आयोजन होत आहे. यावर्षी सुद्धा वधु- वर परिचय मेळाव्याचे आयोजन होत असून उप वधु – वर परिचय स्मरणिका तयार करण्यात येत आहे.
या स्मरणिके करीता वधु – वरांचे परिचय पत्र आणि फोटो दोन्ही सह १५ जानेवारी पर्यंत भुषण पिसे, कार्तिक जनरल स्टोअर, बिडकर कॉलेजच्या बाजुला, फोन – ९७६४२७०९५५ येथे जमा करावे असे आवाहन करण्यात आलेले असुन मेळाव्याची तारीख व स्थळ याची माहिती लवकरच कळविण्यात येईल अशी माहिती संताजी जनसेवा मंडळ हिंगणघाटचे वतीने देण्यात आली आहे.

