उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणारा, बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानास्पद वक्तव्य करणारा देशाचे गृहमंत्री अमित शहा याचा सर्व फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांचे वतीने सांगली येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळापरिसरामध्ये तीव्र शब्दांत निषेध व निदर्शने करण्यात आली या वेळी संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत विवादित बायान दिला. त्याचे प्रतिसाद संपूर्ण देशात उमटत आहे. त्यामुळे अमित शहा याचा मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात येत असून त्याच्या पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
यावेळी आरपीआय चे जेष्ठ नेते सुरेश दुधगावकर, जगन्नाथ ठोकळे, ब्लू पँथरचे अध्यक्ष डॉ. नितिन गोंधळे, माजी नगरसेवक पै. बाळासाहेब गोंधळे, धनंजय खांडेकर, वंचित आघाडीचे जेष्ठ नेते किरणराज कांबळे, (आमदार) काँग्रेस पार्टी चे संतोष पाटील, संजय कांबळे, बौद्ध महासभेचे जितेंद्र कोलप, समता सैनिक दलाचे रत्न तोडकर, संजय कांबळे, रोहित शिवशरण, शेवंता वाघमारे, अनिल साबळे, तसेच सांगली शहरातील विविध भागातून आलेले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

