संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार आंदोलन.
सागर शिंदे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- नुसताच राज्यात अनेक आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे मंत्र्यांना खाते वाटप व्हायचे आहे. मंत्र्यांना खाते वाटप झाल्यानंतर त्यांना पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतलेले यांच्या विरोधात वाशिम जिल्ह्यात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे.
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार आंदोलन युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप पाटील मोरे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पदाधिकारी यांनी आक्रमक होत शिवसेना नेत्या आमदार भावना गवळी यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात यावा त्याचबरोबर मागील पालकमंत्री संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात येऊ नये यासाठी भव्य निदर्शने करण्यात आली.
यामध्ये संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्यामध्ये पाय ठेवू देणार नाही, जर त्यांनी पालकमंत्री पद स्वीकारले तर वाशिम जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या व शिवसैनिकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप पाटील मोरे यांनी दिला या आंदोलनामध्ये शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

