सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- जनता शासकीय- निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर (रजिस्ट्रेशन नंबर: 122 हवेली कॉम्प्लेक्स जिल्हा परिषद समोर कार्यक्षेत्र: नागपूर व अमरावती महसूल विभाग अंतर्गत- नागपूर, चंद्रपूर गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया व यवतमाळ जिल्हा) या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 25/09/2022 रोज रविवारला श्री लीला सभागृह चंद्रपूर येथे पार पडली.
आम सभेचे अध्यक्ष रविंद्र देवाळकर सर हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. अशोकराव जीवतोडे प्राचार्य बीएड शिक्षण महाविद्यालय चंद्रपुर व मोहन राजेश्वर गंधारे माजी मुख्याध्यापक होते. तसेच चंद्रशेखर बदुकले उपाध्यक्ष, सौ. रजनी गंधारे सचिव, कु. कल्पना वाघ कोषाध्यक्ष, प्रकाश कुंभारे सदस्य, मनोहर ठक सदस्य, राघोबा अलाम सदस्य, राजेंद्र ठाकरे सदस्य, ज्ञानेश्वर सोनकुसरे सदस्य, भालचंद्र धांडे सदस्य, श्रीमती डेजुलीना मीनमुले सदस्य, सुरेंद्र अडबाले तज्ञ संचालक यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रथमत: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देवी लक्ष्मी तसेच शिक्षण महर्षी स्वर्गीय श्रीहरी जीवतोडे गुरुजी व स्वर्गीय लिलाबाई जीवतोडे यांच्या फोटोला माल्यार्पण करून सभेची सुरुवात करण्यात आली. सेवानिवृत्त सभासदांचे राजीनामे मंजूर करून त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यामध्ये प्रामुख्याने श्री. किरण मांडवकर,श्री. शामसुंदर बोबडे, श्री. शरद टोंगे, श्री. गंगाधर खिरटकर, सौ. किरण डांगे मॅडम, श्री. वामन खंगार सर, श्री. सुरेश बरडे सर, श्री. रामकृष्ण बागडे सर, श्री. प्रमोद झाडे सर, श्री. राजू वासेकर सर, श्री. हेमराज भोगेकर सर, सौ. मीना कालिदास बोबडे मॅडम, सौ. धनलक्ष्मी मोगरे मॅडम यांचा मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर गुणवंत पाल्यांना प्रोत्साहन पर बक्षीस वितरण करण्यात आले. यात सत्र 2020-2021 मधील वर्ग 10 वा सीबीएसई प्रथम क्रमांक: अंकित विलास पारखी, द्वितीय क्रमांक कुमारी श्रेया निलेश कापसे, तृतीय क्रमांक संभव देवेंद्र बलकी व अभिनव अजय आगलावे. वर्ग 10 वा स्टेट बोर्ड प्रथम क्रमांक कुमारी श्रुती संतोष चव्हाण, द्वितीय क्रमांक नंदेश्वर नरेंद्र काळे, तृतीय क्रमांक कुमारी ऋतुजा राजू वानखेडे. वर्ग 12 स्टेट बोर्ड प्रथम क्रमांक: अमन महेंद्र धमगाये, द्वितीय क्रमांक अनुप रवींद्र देवाळकर, तृतीय क्रमांक कुमारी अनुश्री शेषराव ठाकरे. वैद्यकीय प्रथम क्रमांक कुमारी अदिती अरुण गंधारे, द्वितीय क्रमांक कुमारी पायल वसंतराव उपरे. ग्रॅज्युएट/पोस्ट ग्रॅज्युएट प्रथम क्रमांक कुमारी रुचिता संतोष उपगनलावार, द्वितीय क्रमांक शुभम संजय आत्राम. अभियांत्रिकी विभाग( बी. ई.) प्रथम क्रमांक राहुल रमेश आवारी, द्वितीय क्रमांक शंतनू दिलीपराव वारजूरकर, तृतीय क्रमांक प्रणय मनोहर ठक. अभियांत्रिकी विभाग (एम. टेक.) प्रथम क्रमांक कुमारी पूजा अरुण काळे, द्वितीय क्रमांक निखिल वसंतराव उपरे. पॉलिटेक्निक प्रथम क्रमांक भुवनेश संजय ठाकरे. विशेष पुरस्कार (सेट) प्रथम क्रमांक श्री. संदीप सुधाकर कासवटे द्वितीय क्रमांक श्री. सचिन हनुमंत झाडे. विशेष पुरस्कार (पीएचडी) श्री. सदनार गजानन लिंबाराव, श्री. प्रवीण प्रकाशराव कुलकर्णी व श्री जयंत आनंदराव वानखेडे
तसेच सत्र 2021-2022 साठी वर्ग 10 वा सीबीएसई प्रथम क्रमांक कु. मनस्वी अरविंद आसुटकर, द्वितीय क्रमांक कु. उत्कर्षा विद्याधर रामटेके, तृतीय क्रमांक साईॠतेजीत पवन देवीरेड्डी, प्रोत्साहन पर निर्मिक अविनाश चवले. वर्ग 10 वा स्टेट बोर्ड प्रथम क्रमांक राम सुधीर झंझाड, द्वितीय क्रमांक नकुल बबनराव निंबाळकर, तृतीय क्रमांक कुमारी प्राजक्ता मनोज कविराजवार. वर्ग 12 वा विज्ञान शाखा प्रथम क्रमांक श्याम सुधीर झंझाड, द्वितीय क्रमांक कुमारी श्रेया संजय जोशी तृतीय क्रमांक, कुमारी राधिका विनोद गावंडे. वर्ग 12 वा वाणिज्य शाखा प्रथम क्रमांक कुणाल ज्ञानेश्वर काटोले. वर्ग 12 कला शाखा प्रथम क्रमांक साकेत सचिन कलोडे. आचार्य पदवी (पीएचडी) विशेष पुरस्कार डॉक्टर किशोर चौरे व डॉक्टर रजत मंडल. वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) प्रथम क्रमांक कुमारी दिव्या संतोष पालीवार, द्वितीय क्रमांक अनित्य परशुराम गोवर्धन, प्रोत्साहन पर कुमारी रिया शिवराम सातपुते. बी.डी.एस. प्रोत्साहन पर कुमारी प्रणाली सुधाकर कावडे. बी. फार्म. प्रोत्साहन पर कुमारी साक्षी संजय झाडे. बी.एस.सी./ एम. एस. सी./ एम. सी. ए./ एम. बी. ए. प्रथम क्रमांक अक्षय विजयराव पिदुरकर, कुमारी सलोनी प्रकाश कुंभारे, कुमारी श्वेता संजय आत्राम, हेमंत कवडू गिलबिले प्रोत्साहन पर. अभियांत्रिकी पदवी प्रथम क्रमांक कुमारी सहेरीश संजु पठाण द्वितीय क्रमांक कुमारी मीनल ज्ञानेश्वर काटोले. यांना मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
सर्वसाधारण सभेला प्रमुख पाहुणे श्री. मोहन राजेश्वर गंधारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच डॉ. श्री. अशोकराव जीवतोडे प्राचार्य बीएड शिक्षण महाविद्यालय चंद्रपूर यांनी संबोधित केले आपल्या संबोधनात डाॅ. श्री. अशोकराव जीवतोडे यांनी सांगितले की, “संस्थेने सामाजिक हीत जोपासले पाहिजे, तेव्हाच प्रगती होणार”. या सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक श्री. रवींद्र देवाळकर सर अध्यक्ष, संचालन सौ. विनिता सुधाकर सोयाम( केराम) तसेच आभार प्रदर्शन सौ. रजनी गंधारे मॅडम( सचिव) यांनी केले.
सर्वसाधारण सभेत विषय सूचीनुसार ठराव सर्वसंमतीने पारित करण्यात आलेत. सर्वसाधारण सभा सफल करण्यात जनता शासकीय- निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित च्या सर्व शाखेतील कर्मचाऱ्यांचा सहभाग लाभला.

