पंकेश जाधव , पुणे जिल्हा प्रतिनिधी.
सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हाद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अविनाश कोडे, पोलीस अंमलदार सागर शेडगे यांना बातमी मिळाली की चोरीची मोटार सायकल घेवुन एक इसम हा रघुनंदन हॉल सर्व्हिस रोड येथे उभा असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने सदरची बातमी तपास पथकाचे अधिकारी सपोनि सचिन निकम यांना कळविली व त्यांनी सदरची बातमी मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे व पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर यांना कळविल्याने त्यांनी नमुद इसमास ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करा असा आदेश दिल्याने वरील मिळाले.
बातमीचे ठिकाणी सापळा रचुन त्यास पकडुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव शिवकुमार जयभीम दोडमणी वय २५ वर्षे रा. स.नं. ६५९ शिवतीर्थनगर बिबवेवाडी पुणे असे असल्याचे सांगितले त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या मोटार सायकल चाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदरची मोटार सायकल ही चोरी केल्याचे सांगितल्याने त्याचेकडे अधिक तपास करता त्याने १)सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १७१ / २०२२ भादवि कलम ३७९ २) सिंहगडरोड पो स्टे गुन्हा रजि. नं. ४११ / २०२२ भादवि कलम ३७९ ३) मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजिन ८३ / २०२२ भादवि कलम ३७९ असे तीन गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त श्रीमती पौर्णिमा गायकवाड, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगडरोड विभाग श्री सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आबा उतेकर, पो. अंमलदार संजय शिंदे, शंकर कुमार, अमेय रसाळ, विकास बांदल, अमित बोडरे, विकास पांडुळे, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, अमोल पाटील, अविनाश कोडे.. सागर शेडगे यांचे पथकाने केली आहे. पुढील तपास सपोनि सचिन निकम सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहे.

