अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील यशवंत नगर मॉस्टर कॉलनी येथील घरात अज्ञात चोरट्यांने घराचे कुलूप तोडून घरा तील कपाटातून नगदीसह ६३ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार शरद अवचट 27 डिसेंबरला सायंकाळी 6.00 वाजता घराला कुलूप लावून आपल्या कुटुंबासह शहरातील रंगारी वार्डातील राहणाऱ्या सासऱ्याकडे गेले होते. 28 डिसेंबरला सकाळी 10.30 वाजता घरी परत आले असता त्यांना घराचे मुख्य दाराचे कुलूप तुटून दिसले. यावेळी त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील कपाटातील सामान अस्त व्यस्त पडुन दिसले. त्यांनी कपाट बघितले असता कपाटातील नगदीसह 63 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. यासंबंधी हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
हिंगणघाट पोलिसानी या प्रकरणात गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

