पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- 31 तारखेला नववर्षानिमित्त नागपूर शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी नाकाबंदी केली होती. याच दरम्यान एका स्कूटीमधून 41 लाख रुपयाची मोठी रक्कम मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. या पैशांचा हवाला व्यवसायाशी संबंध असावा, असा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका स्कूटीमधून 41 लाख जप्त केले यात पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती आयकर विभागालाही दिली आहे. याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध शहर तहसील पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरला नागपूर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शिवाजी चौकाजवळ पोलीसानी नाकाबंदी करून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाची तपासणी करत होते. यावेळी पोलिसांनी स्कूटरवरून जाणाऱ्या दोन तरुणांना अडवले. चौकशीत त्याच्या स्कूटरच्या डिखी मधून 41 लाख रुपये मिळून आले. यावेळी त्यांना या पैस्या बाबत विचारणा केली असता पैशाचा हिशेब देता आला नाही. त्यामुळेच हा पैसा हवालाचा असल्याचा संशय पोलिसांना आहे.
