आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! आळंदी/पुणे:- राज्यात महिला, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचं प्रमाण सध्या एवढं वाढलंय की कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न विचारला जातोय. पुण्यातील आळदीतून एक संतापजनक घटना समोर आल्यानं एकच खळबळ माजली आहे. आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन वारकरी साधक विद्यार्थ्यांवर सोबत राहणाऱ्या 28 वर्षीय नराधम महाराजाने बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत नराधम महाराजाला एका महिलेने मदत केल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी दि. 4 जानेवारी मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत घडली आहे.
अत्याचार प्रकरणी आळंदी पोलिसांनी नराधम आरोपी विरोधात पाँस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या असून महेश नामदेव मिसाळ वय 28 वर्षें रा. खोकरमोहा, ता. शिररकासार, जि. बीड असं त्याचं नाव आहे. दरम्यान, साथीदार महिला आरोपी वरील आरोपाचा तपास सुरू असून तिला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे
प्राप्त माहितीनुसार, आळंदी येथील वडगाव रस्त्याला वारकरी शिक्षण देणारी खाजगी ज्ञानेश्वरी गुरुकुल या नावाने संस्था आहे. येथे अल्पवयीन मुले वारकरी शिक्षण घेत आहेत. तर त्या संस्थेत आरोपी हा देखरेखीच काम पाहत होता. शनिवारी मध्यरात्री आरोपी हा पीडित मुलांच्या खोलीत येऊन त्यांच्या शेजारी झोपला. दरम्यान ही मुले झोपली असताना आरोपीने त्यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.
याबाबत सदर महिलेला समजल्यावर तिने प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला. मुलांनी याबाबत आपल्या आईला सांगितल्यावर पालकांच्या पाया खालची जमीन सरकली त्यानंतर मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अत्याचार करणाऱ्या महाराज ला बेड्या ठोकल्या आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे.

