पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रदेशाचे 53 वें प्रदेश अधिवेशन दिनांक 28 ते 30 जानेवारी 2025 रोजी स्मृति मंदिर परिसर रेशीमबाग मैदान नागपूर येथे संपन्न होणार आहे. हे अधिवेशन विदर्भ प्रदेशाच्या युवा तरूणाईला नवी उर्जा व दिशा देणारे ठरेल. या अधिवेशनात विदर्भाच्या 120 तालुके व 119 मोठे सेंटरवरून एकूण असे 239 स्थानांवरून 550 महाविद्यालयातून 2000 विद्यार्थी प्रतिनिधी या अधिवेशनात सहभाग घेणार आहेत.
नागपूरातील पावनभूमिवर तब्बल 13 वर्षानंतर विदर्भ प्रांताचे अधिवेशन होत आहे आणि विदर्भाच्या इतिहासात हे सर्वात मोठे अधिवेशन नागपूरात होणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन विदर्भ प्रांताचे ऐतिहासिक अधिवेशन ठरणार आहेत. या अधिवेशना दरम्यान भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. ज्यामध्ये विदर्भातील विविध जिल्हयांच्या माध्यमातून वैदर्भीय संस्कृतीचे दर्शन होईल. या शोभा यात्रेचा शेवट जाहीर सभेने होणार आहे. या जाहीर सभेच्या मंचावरून विदर्भ प्रांतातील छात्रनेते विविध विषयांवर भाषण देणार आहेत. अशी माहिती स्वागत समिती सचिव आशिष उत्तरवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या अधिवेशनाच्या स्वागत समितीत नागपूरातील सुप्रसिद्ध उद्योजक विरेंद्र कुकरेजा स्वागत समिती अध्यक्ष असतील. तर स्वागत समिती सचिव आशिष उत्तरवार असतील. त्याचप्रकारे या स्वागत समितीचे संरक्षक म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे, महाराष्ट्र राज्य मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, सेवानिवृत्त न्यायधिश श्रीमती. मीरा खंडक्कार, डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर, महाराष्ट्र बार कौन्सिलींग अध्यक्ष पारिजात पांडे, आमदार मोहन मते, आमदार प्रविण दटके व इतर मान्यवर संरक्षण समितीचे सदस्य असतील. सदर वृत्तांत स्वागत समिती सचिव आशिष उत्तरवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करतांना दिले.
युवा म्हणजे भविष्यातील भावी नेतृत्व आणि ते नेतृत्व या अधिवेशना दरम्यान विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून नागपूरला येणार आहेत. ही नागपूरकरांना लाभलेली मोठी संधी आहे. या संधीचे सोने करून विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाला येणाऱ्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचे नागपूरकरांनी स्वागत करावेत व अधिवेशनाला भरभरून सहकार्य द्यावेत असे आवाहन स्वागत समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नागपूरातील जनतेला केले.
विदर्भ प्रांताच्या 53 वें अधिवेशन कार्यालय आनंद टॉकीज चौक, सीताबर्डी येथे असणार. या कार्यालयाचे उद्घाटन दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी, वेळ सायंकाळी 5 वाजता पार पडले. या उद्द्घाटना प्रसंगी माजी खासदार अजय संचेती उद्द्घाटक म्हणून उपस्थित होते. तर विशेष उपस्थिती विदर्भ प्रदेश मंत्री कु. पायल किनाके यांची होती.

