गुलाब सोनी . पुणे शहर प्रतिनिधी
सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर
सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील आरोपी नामे चेतन पांडुरंग ढेबे वय २५ वर्षे,
रा. सर्वे नं. ११, महादेव मंदीराशेजारी, महादेवनगर, हिंगणे खुर्द, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर १६ साथीदार यांचेवर सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे शरिराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत..यातील आरोपी नामे चेतन पांडुरंग देवे, वय-२५ वर्षे, रा. सर्वे नं. ११, महादेव मंदीरा शेजारी, महादेवनगर, हिंगणे खुर्द, पुणे हा मुख्य (टोळी प्रमुख असुन त्याने त्याचे टोळी मधील इतर साथिदार नामे २) बाळु धोडींबा देवे, वय २४ वर्षे रा. परीसर क्र. ३. राममंदीराजवळ, जनता वसाहत, पुणे ३) अनुराग राजु चांदणे, वय २० वर्षे, रा. गुरु कृपा अपार्टमेंट, पहीला मजला, महादेव नगर, हिंगणे खुर्द, पुणे ४) रमेश धाकलु कचरे वय १९ वर्षे, रा. विजय डेअरी शेजारी, कात्रज गाव, पुणे ५) वैभव शिवाजी साबळे, वय-२० वर्षे, रा. महादेव मंदीरा शेजारी, महादेवनगर, हिंगणे खुर्द, पुणे ६) रोहन दत्ता जाधव, वय-२० वर्षे, रा. ग.नं.३. महादेवनगर, हिंगणे खुर्द, पुणे ७) अक्षय तायाजी आखाडे, वय २१ वर्षे, रा. महादेव मंदिराजवळ, महादेवनगर, हिंगणे खुर्द, पुणे ८) सुनिल धारासिंग पवार, वय १९ वर्षे रा. मारुती मंदिराजवळ, रायकर मळा, धायरी गाव, पुणे ९ ) साहिल बबन उघडे व आठ विधीसंघर्षीत बालके यांचेसह स्वतःचे तसेच टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे व अवैद्य मार्गाने इतर फायदा व्हावा म्हणुन स्वतः किंवा टोळीतील सदस्यांना चिथावणी देऊन, सिंहगड रोड परिसरात मारामारी करणे खुनाचा प्रयत्न करणे, कोयता आणि इतर घातक शस्त्रे जवळ बाळगून दंगा करणे अश्या प्रकारचे गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्याच्या टोळीच्या अश्या कृत्यामुळे सदर परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली आहे. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखिल त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
सदर आरोपी यांचेविरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३५८ / २०२२ भादवि क.३०७, १४३, १४४, १४५, १४८, १४९, ४२७, ५०४, ५०६, ऑर्म अॅक्ट ३ (२५), ४(२५) महा.पो.का.क.३७ (१) (३) सह १३५. क्रिमीनल लॉ अमेंडमेंट का क. ७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. नमुद गुन्हयाच्या तपासादरम्यान टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे टोळीचे फायदयासाठी प्रस्तुत गुन्हा
केला असल्याचे दिसुन आलेने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) . ( २ ). ३ (४) चा अंतर्भाव होण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश संखे यांनी श्रीमती. पोर्णिमा गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परि-३. पुणे शहर यांचे मार्फतीने श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे यांना सादर केला होता.
त्यांनी नमुद गुन्हयांचे अवलोकन व अभ्यास करुन टोळी प्रमुख नामे चेतन पांडुरंग देबे वय २५ वर्षे, रा. सर्वे नं. ११ महादेव मंदीराशेजारी महादेवनगर, हिंगणे खुर्द, पुणे व त्याचे इतर १६ साथीदार यांचे विरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३५८ / २०२२ भादवि क. ३०७, १४३, १४४, १४५, १४८, १४९, ४२७,५०४, ५०६, ऑर्म अॅक्ट ३ (२५), ४ (२५) महा. पो. का. क.३७ (१) (३) सह १३५ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट का. क 19 प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) . ३ ( २ ). ३ (४) चा अंतर्भाव करण्याची परवानगी दिली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. सुनिल पवार, सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे
हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा.सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त, परि.-३, पुणे शहर श्रीमती पौर्णिमा गायकवाड, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर श्री. सुनिल पदार यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे श्री. शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे व श्री प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक (गुन्हे)(तत्कालीन), श्री. जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि. सचिन निकम यांचेसह सव्हॅलन्स पथकाचे महिला पोलीस अंमलदार, मिनाक्षी महाडीक, पोलीस अंमलदार, स्मित चव्हाण गुरव यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालु वर्षातील ३३ वी व एकुण ९६ वी कारवाई आहे.

