संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा :- दिनांक 05 जानेवारी रोज रविवारला ला सम्यक बुध्द विहार सोमनाथपूर वॉर्ड राजुरा येथे भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका शाखा व राजुरा शहर शाखाची जुन्या कार्यकरणीच्या कार्यकाल संपलेला असल्यामुळे नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या बैठकीची सुरुवात पाहुण्यांचे हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना हार अर्पण करून अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित करण्यात आली. नंतर सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. त्यानंतर संचालन व प्रास्ताविक गौतम चौर यानी राजुरा तालुक्यात आणि शहरात भारतीय बौद्ध महासभा आणि केलेल्या कार्याचा आढावा वाचून दाखविला यानंतर कार्यक्रमचे प्रमुख मार्गदर्शक जिल्ह्याचे अध्यक्ष किशोर तेलतुंबडे, संदीप सोनोणे जिल्हा सरचिटणीस, गुरुबालक मेश्राम जिल्हा कोषाध्यक्ष, प्रफुल भगत जिल्हा उपाध्यक्ष, के.गजभिये यांनी कार्यरत असलेली शाखा बरखास्त करण्याची घोषणा केली. त्यानंतर सर्वानुमते नवीन शाखाची निवड करण्यात आली.
राजुरा तालुका शाखा अध्यक्षपदी धर्मुजी किसन नगराळे, सरचिटणीस पदी गौतम चौरे, कोषाध्यक्ष पदी गौतम देवगडे, राजुरा शहर शाखा अध्यक्षपदी गौतम जुलमे, सरचिटणीस किरण खैरे, कोषाध्यक्ष वंदना देवगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या कार्यक्रमाला राजुरा तालुक्यातील आणि शहरातील भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी तसेच राजुरा तालुक्यातील ग्राम अध्यक्ष अशोक दुबे, राहुल भगत, किरण कुंभारे, पूरसोत्तम वनकर, उपाध्यक्ष मुरलीधर ताकसांडे, उपाध्यक्ष संतोष कांबळे, प्रा.दिनेश घागरगुंडे राजुरा संघटक, राजहंस पिपरे, शितल ब्राम्हणे, शहर अध्यक्ष मेघा बोरकर, साक्षी नळे, प्रणाली ताकसांडे, रत्नमाला मावलीकर, प्रेमीला नळे, शुमांगी धोटे, अर्चना निमसरकर, किशोर रायपूरे, सचीदानंद रामटेके, सतीश ब्राम्हणे, सतीश कांबळे, उत्तम रामटेके यांना तालुका व शहर मध्ये पद देण्यात आले आणि उपासक, उपसीका यांची खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
राजुरा तालुक्याचे अध्यक्ष म्हणून धर्मुजी किसन नगराळे यांची उपासक, उपसीका यांच्या मागणी ने पुन्हा निवड करण्यात आली. त्यांनी राजुरा तालुक्यामध्ये भारतीय बौध्द महासभा संघटना मधून बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी कटिबध्द राहून सर्व पदाधिकारीचे मार्गदर्शन मधून आभार मानले तसेच राजुरा शहराचे अध्यक्ष गौतम जुलमे यांची निवड करण्यात आल्यामुळे राजुरा तालुका व शहरात सगळीकडे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गौतम देवगडे यांनी केले. यावेळी गौतम देवगडे व वंदना देवगडे यांच्या शाल देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर शेवटी सरनत्य घेऊन बहुसंख्येने उपस्थिती मध्ये या कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

