पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- 6 जानेवारी रोजी बाळशास्त्रीं जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले. त्याचे स्मरण म्हणून आपण 6 जानेवारी रोजी महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे श्रेय जाते बाळशास्त्री जांभेकर यांना, ज्यांनी 1832 साली ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान मराठी पत्रकारिता आणि समाज सुधारणेत अमूल्य आहे.
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 213 व्या, जयंतीनिमित्त 6 जानेवारीला नागपूर येथील टिळक पत्रकार भवनातील त्यांच्या अर्धपुतळ्याला माल्यार्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या बदल आणि आजची पत्रकारिता याबाबत भाष्य केले आणि पत्रकाराबाबत वर्तमाना बाबत सविष्टर मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनेक पत्रकारांची उपस्थित होती.
यावेळी टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे उपाध्यक्ष व व्यवस्थापक प्रभाकर दुपारे यांनी जांभेकरांना अभिवादन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी हरीश तिवारी, योगेश पांडे, दिलीप कांबळे, भीमराव लोणारे तसेच ज्येष्ठ पत्रकार राजीव जोशी, पल्लवी मेश्राम यांची उपस्थिती होती.

