महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन केरळ:- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. केरळच्या थलासरी न्यायालयाने हा निर्णय मंगळवारी दिला. 2005 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) सीपीआय (एम) चा कन्नपुरम चुंडा येथील कार्यकर्ता रिजिथ शंकरन याची हत्या करण्यात आली होती. 3 ऑक्टोबर 2005 रोजी हे हत्याकांडाची घटना घडली होती. या प्रकरणात थलस्सेरी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने 9 स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
काय आहे हे प्रकरण: मृतक रिजिथ शंकरन याची हत्या 2005 मध्ये करण्यात आली होती. रिजिथ हा डाव्या विचारांचा कार्यकर्ता होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सीपीआय (एम) यांच्यात वादावादी सुरु होती. 3 ऑक्टोबर 2005 रोजी रिजिथ हा त्याच्या घरी पायी जात असताना यावेळी त्याच्या सोबत त्याचे मित्रही होते. त्यावेळी संघ स्वयंसेवकांचा एक जमाव त्या ठिकाणी आला. त्यांच्याकडे शस्त्रं होती. त्यांनी रिजिथ आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली. रिजिथला या मारहाणीत गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर जखमाही झाल्या. तर त्याचे इतर मित्र जखमी झाले. या प्रकरणात आता थलासरी न्यायालयाने 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुधाकरन वय 57 वर्ष, जयेश वय 41 वर्ष, रणजीत वय 44 वर्ष, अजींदरन वय 51 वर्ष, अनिल कुमार वय 52 वर्ष, राजेश वय 46 वर्ष, श्रीजीत वय 43 वर्ष आणि भास्करन वय 67 वर्ष या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
पोलिसांचा तपास: संघाच्या या स्वयंसेवकांकडे दोन तलवारी, एक मोठा खंजीर आणि एक स्टिलचा रॉड होता. पोलिसांनी ही शस्त्र जप्त केली होती. तसंच पोलिसांना आरोपींचे रक्ताने माखलेले कपडेही मिळाले. या प्रकरणात 14 मार्च 2006 रोजी आरोपी विरोधात आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यात 28 साक्षीदारांच्या साक्षी या प्रकरणात नोंदवण्यात आल्या. तसंच 59 पुरावे आणि दस्तावेज यांची ओळख पटवण्यात आली.
पोलिसांनी भादवी कलम 303 हत्या, 307 हत्येचा प्रयत्न करणे, 134 बेकायदेशीर एकत्र होने या अंतर्गत आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसंच कलम 147 दंगा व 324 या कलमांच्या अंतर्गतही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या सगळ्यांना 4 जानेवारी या दिवशी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानेही दोषी ठरवलं होतं. एकूण 10 स्वयंसेवक या गुन्ह्यात सहभागी होते. मात्र यातल्या एकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या 9 आरोपींना हत्या केल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
