आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणीने केला विश्वासघात केल्यामुळे रागातून IT तरुणाने कोयत्याने घाव घालत येरवडा येथील डब्ल्यु एन एस कंपनीत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तरुणीची हत्या केल्याने खळबळ माजली आहे. शुभदा शंकर कोदारे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून कृष्णा सत्यनारायण कनोजा वय 28 वर्ष, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर असे आरोपीचे नाव असून याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक शुभदा कोदारे आणि कृष्णा कनोजा हे दोघे डब्ल्यु एन एस कंपनीत अकाऊंट विभागात वेगवेगळ्या सेक्शनमध्ये काम करत होते. या दोघांची 2022 पासून ओळख होती. वडिलांना हाय शुगर आहे, त्यांच्या ऑपरेशनसाठी, ट्रिटमेंटसाठी पैसे लागत असल्याचे सांगून तिने कधी 25 हजार तर कधी 50 हजार रुपये असे कृष्णा सत्यनारायण कनोजा याच्याकडून तब्बल 4 लाख रुपये घेतले होते. तरी तिची पैसे मागण्याची मागणी थांबत नव्हती, त्यामुळे कृष्णाला संशय आला. शेवटी काही दिवसांपूर्वी तो कराड गेला. तिच्या वडिलांना भेटला. तेव्हा त्यांनी आपली कसली शस्त्रक्रिया झाली नाही की शुगरच्या उपचारासाठी इतके पैसे मी तिच्याकडे मागितले नाही, असे वडिलांनी सांगितले. आपल्याला वडिलांच्या आजारपणाचे कारण सांगून विश्वासघात केल्याची भावना कृष्णाच्या मनात निर्माण झाली. त्यातूनच तो तिला उसने घेतलेले पैसे परत मागत होता. तेव्हा झालेल्या वादावादीत विश्वासघाताच्या दु:खातून त्याने कोयत्याने तिच्या हातावर जोरात घाव घातला. त्यात तिच्या हाताच्या नसा तुटल्या. ती लो शुगरची रुग्ण असल्याने तिचे रक्त गोठले जाण्याची प्रक्रिया न झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यातच तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी शुभदाच्या बहिणीने येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
आपला विश्वासघात केला आणि रागात: आपला विश्वासघात केला, अशी कृष्णाची भावना झाली. त्यातूनच तो तिच्याकडे उसने पैसे परत करण्याची मागणी करु लागला होता. विश्वासघातामुळे त्याच्या मनात तिच्याविषयी राग साचून राहिला होता. तिला धमकावावे असा हेतू ठेवून त्याने कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदाला गाठले. त्यांच्यातच बोलाचाली झाली. वाद वाढल्याने रागाच्या भरात त्याने जोरात 5 वार तिच्या हातावर केले. हे वार इतके जोरात होते की, त्यात शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या. तिला तातडीने सह्याद्री रुग्णालयात नेण्यात आले. तिला लो शुगरचा आजार आहे. त्यात तिचे रक्त गोठवले जात नसल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यातच तिला कार्डिक अॅटक आला आणि त्यातच तिचा मृत्यु झाला.

