अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात घर फोडीच्या घटना वाढल्या असताना आता चालत्या बस मधून एका महिलेची पैसे आणि सोन्याचे दागिने असलेली पर्स लपास केल्याची चोरीच्या घटना समोर आल्याने हिंगणघाट मध्ये खळबळ उडाली आहे.
हिंगणघाट शहरातील बस स्थानकावरून बसने जामकडे निघालेल्या महिलेच्या थैल्यातील पर्स अज्ञात चोरट्यांने चोरून नेली. या पर्स मध्ये नगदी 50 हजार 300 रुपये रोख व 8 हजार रुपये किमतीचे सोने असा एकूण 58 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल होता.
प्राप्त माहितीनुसार, शुभांगी तुराळे राहणार सोनेगाव राऊत यांनी श्रीकांत राऊत यांच्याकडून शेतीच्या मकत्याचे 50 हजार रुपये घेऊन त्या वरोरा जाण्यासाठी बसने हिंगणघाट येथे आल्या व हिंगणघाट बस स्थानकावरून बस मध्ये बसून जामकडे निघाल्या. यावेळी तिकीट काढण्यासाठी पैसे पाहिले असता थैलीत असलेली पर्स अज्ञात चोरट्यांने चोरुन नसल्याचे निदर्शनास आले. यासंबंधी हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसानी आरोपी चोरट्या विरुध्द चोरीच्या गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

