निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
कोरपणा:- शाळा आणि महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम २००३ कायद्यान्वये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास प्रतिबंध आहे, मात्र कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरपना येथील शाळेच्या आवारात सरार्सपणे पानटपऱ्या आणि दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे मोहब्बत खान यांचा लक्षात येताच तंबाखू विक्री बंद करण्यासास निवेदन देन्यात आले होते परंतु शाळेकडून कारवाई तर दूर शाळेचे मुख्यध्यापक यांनी निवेदनाच्या उत्तरात आम्ही शाळेकडून कुठलीच कारवाई सदरच्या गुटखा विक्रीवर करू शकत नाही असे मोहब्बत खान यांना लेखी पत्राद्वारे कळविले तंबाखू पदार्थांच्या सेवनाने कर्करोगाला आमंत्रण मिळू शकते. लहान मुलांसह तरुणांमध्ये या पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचा विचार करून शासनाने शाळांसह महाविद्यालयाच्या शंभर मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास कायद्यान्वये निर्बंध घातले आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पानटपऱ्या आणि दुकानांवर कारवाईचा बडगा अन्नऔषध प्रशासनाकडून सर्वत्र उगारला जात असला तरी, कोरपना येथे मात्र कारवाई शून्यच आहे. सदरची बाब ही गंभीर असल्यामुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद शंद्रपुर यांच्याकडे मोहब्बत खान यांनी संबंधित मुख्यध्यापक यांच्यावर कारवाईची ईमेल द्वारे मागणी केली आहे.

