वयोवृद्ध महिलेला किराणा सामान, कपडे, भांडे, ब्लेंकेटसह अन्य साहित्याची मदत.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 13 जाने:- महाराष्ट्र् – तेलंगाना सीमावर्ती भागलगत असलेल्या लक्कडकोट जवळील घोटा या गावात लक्ष्मीबाई नारायण मदासी वय 80 वर्ष या वयोवृद्ध महिलेच्या घराला शोर्ट्सरकिटमुळे अचानक पहाटेच्या वेळेस आग लागली. यात आगीने रौद्ररूप धारण करत लक्ष्मीबाईच्या घराची व त्यातील प्रत्येक साहित्याची राखरांगोळी केली. ही महिला घरात एकटीच राहत असून तिचे सर्व कागदपत्रासह संसार उपयोगी सर्वच साहित्य, रोख रक्कम, सोन्याचे दागिने, भांडे आदिसह घरातील सर्वच साहित्य जळून राख झाले.
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेत शेतातील विहिरीतून पाईपलाईन टाकून आगीवर नियंत्रण मिळविले. घरात सिलेंडर होते पण त्यात कमी गॅस असल्याने मोठी हाणी टळली. आजूबाजूला अनेक घरांमध्ये कापूस, जनावरांसाठी चारा, धान, तनिस होती परंतु गावकऱ्यांच्या सतर्कतेने आणि सिलेंडर मधील गॅस कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. त्या वयोवृद्ध महिलेच्या नुकसानीबाबत नेफडो च्या महीला संघटीका शीला दिलिप जाधव यांनी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांना कळविले असता त्यांनी लगेच या घटनेची माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली.
यावेळी मयूर विलास बोनगिरवार, मिलींद गड्डमवार, माधुरी गड्डमवार यांनी किराणा साहित्य, शंकर बुर्हान, गोविंदा तम्मिवार, सूनैना तांबेकर, सुवर्णा बेले, बबलू चव्हाण, रवी बुटले आदींसह नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी, संघटक, सदस्य यांनी मदतीचा हात पुढे करून त्या वृद्ध महीले पर्यंत भांडे, कपडे, ब्लेंकेट, साड्या, किराणा साहित्य अशी मदत पोहचविली. यावेळी आदिवासी सेवक वाघुजी गेडाम, विमलदेवी गेडाम, दिलीप जाधव व गावकरी उपस्थीत होते.
बादल बेले, महाराष्ट्र् राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था लक्कडकोट जवळील घोटा या गावात लक्ष्मीबाई मदासी या ८० वर्ष वयोवृध्द महिलेच्या घराला आग लागल्याने तिचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या दुःखाच्या प्रसंगी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था मदतीला धाऊन जात त्या महिलेला किराणा, कपडे, ब्लेंकेट, भांड्यांची मदत केली. आम्ही आपले कर्तव्य पार पाडले. पर्यावरण संवर्धन व मानवता विकासा करिता आम्ही कटिबद्ध असून यथाशक्ती मदत करण्याची आमची भूमिका राहील. शासन स्तरावर या वयोवृध्द महिलेला तात्काळ शक्य ती मदत करावी तसेच तिला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देऊन हक्काचे घर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी बादल बेले यांनी केली आहे. तसेच गावकऱ्यांनी दाखविलेली समयसूचकता व वेळीच मदतीला धाऊन आल्याने मोठा अनर्थ व जीवित, वित्तीय हाणी टळली त्याबद्दल समस्त गावकऱ्यांचे अभिनंदन केले.

