पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी याबाबत पत्र काढून रवींद्र चव्हाण यांची निवड केली आहे.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्य मंत्रिमंडळात महसूल मंत्री बनल्यानंतर भाजपाने रवींद्र चव्हाण यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमले आहे. राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेले रवींद्र चव्हाण यांना भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष निवड झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्यात असलेला विश्वास संघटन कौशल्य व संघटनेतील प्रदीर्घ अनुभव पक्षाला महाराष्ट्रात नव्या उंचीवर घेऊन जाईल अशी भावना व्यक्त करण्यात आली.

