आरिफखांन हबीबखांन पठान यांची पत्रकार परिषदेत लावला अंजूमन हामी ए इस्लाम संस्थेवर गंभीर आरोप.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- अंजूमन हामी ए इस्लाम या संस्थेत अर्थिक गैरवापर झाल्या कारणाने कोर्टा व्दारे प्रशासक नियुक्त करण्यात आले असताना आपल्यावर कार्यवाही होऊ नये म्हणून त्यांनी कार्यकारी अधिकारी यांची प्रथम नियुक्ती केली. सदर संस्थेमध्ये एकुण १५ पदे भरण्यात येत असून शाळा संहिता १९८१ नुसार भरतीचे सर्व अधिकार प्रशासकाला नसुन नियमाप्रमाणे शाळा समितीला आहे.
शाळा समितीचे सचिव मुख्याध्यापक, संबंधित विषय शिक्षक तसेच शाळेचे चपराशी असणे बधनकारक असुन निवड प्रक्रियेत मुलाखत समिती मध्ये या तिघापैकी एकाचाही सहभाग नाही ही अत्यंत गंभीर बाब असुन मुलाखत समिती गठीत करीत असतांना नियमांचे पालन झाले नसल्याचे निदर्शनास येते. मुख्याध्यापक शाळा क १ अंजूमन हायस्कुल सदर नागपूर, राबिया बेगम शाळा क्र २ अंजूमन हायस्कुल महल, नागपूर अब्दुल लतीफ शाळा क्र ३ अंजूमन हायस्कुल हसनबाग, नागपूर मोहम्मद समिर यांनी जाणिवपूर्वक कानाडोळा करीत प्रशासक जका हक यांची भासी निशात मुमताज अली यांची पात्रता नसतांना ही निवड केली. कार्यकारी अधिकारी अनिस सर यांची सुन शबनम अफरोज आवश्यक स्नातक पदवी परीक्षेत मराठी साहित्य विषय नसतांना सुद्धा निवड केली. तसेच अकबर सर यांचे नातेवाईक शाहीन फारूकी यांचे उर्दू नसुनही निवड केली. नागपूरमध्ये लोकांत चर्चा आहे की कोटयावधी रूपयांची देवाण घेवाण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्याध्यापक सर्वस्वी जबाबदार असुनही त्यांच्या सहमतीने होत असल्याचे दिसून येते
माध्यमिक शिक्षण सेवक निवड करीत असतांना उर्दू माध्यमावरील मराठी विषय निवड करीत असतांना आवश्यक प्रात्रता १) बी.ए अंतीम वर्ष ५० टक्के पेक्षा जास्त गुण २) बी.ए मराठी साहित्य ३) उर्दू विषयामध्ये माध्यमिक शालांत परीक्षा अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उर्तीर्ण ४) बी. एड मध्ये अध्यापण पद्धती मराठी असणे आवश्यक असुन निवड झालेल्या उमेदवारांमध्ये पात्रता नियमानुसार नसल्याचे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे शाळा प्रशासनावर योग्य कारवाई व्हावी.
वरील प्रकरणी क्र १ ते क्र ३ शाळांमध्ये मराठी विषयाच्या अध्यापना करीता शिक्षण सेवकाची निवड झाली असुन महाराष्ट्राची राजभाषा मराठी असुन महाराष्ट्रीय समाज निर्मार्ती करीता मुस्लीमांना मराठी येणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या विकासात मुस्लीमांनी देखिल आपला वाटा देणे गरजेचे असुन या अमराठी शाळांमध्ये मराठी विषय नसलेल्या शिक्षकाकडून या उदिदष्ठाची परीपूर्तता होणे कठीण असुन हा मराठी भाषेचा अपमान असुन एकीकडे मराठीच्या संगोपाना करीता शासन अनेक कार्यक्रमांचा आयोजन करीत असताना या शाळांमधून निघणारे लक्षावधी विद्यार्थी आपल्या मायबोली मराठीपासून वंचित राहतील ही महाराष्ट्राच्या अस्मिते विरूद्ध असल्याने आपण जातीने लक्ष बलून या समस्येकडे लक्ष द्यावे व विभागिय चौकशी करीता आदेश द्यावे अशी मागणी श्री आरिफखांन हबीबखांन पठान यांची पत्रकार परिषद मधे केली.

