मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अल्लीपुर येथे शंकरपट व्यवस्थापक कमेटी द्वारा आयोजित शेतकरी शंकरपट, कृषी प्रदर्शनीला वर्धा जिल्ह्याचे खासदार अमरभाऊ काळे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, प्रसिद्ध रिल्स स्टार साधा माणुस विलास झट्टे यांची उपस्थीती होती.
याप्रसंगी बैलगाडी शर्यतीचा थरारक अनुभव घेतला. तसेच आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनीला भेट देत उपस्थितांना मार्गदर्शन केलें. याप्रसंगी आयोजक समितीच्या वतीने केलेला सत्कार स्वीकारून आयोजक समितीचे आभार मानले.
याप्रसंगी हिंगणघाट शहराध्यक्ष बालू वानखेडे, समाजसेवक सुनिल डोंगरे, माजी नगरसेवक सतिश धोबे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, प्रभाकर फटींग, श्रीकांत भगत, मिलिंद हिवलेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

