अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अभिनव विचार मंच हिंगणघाट वतीने युगपरूष स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी अभिनव विचार मंचाचे अध्यक्ष नितीन सुकळकर , प्राची प्रसाद पाचखेडे , ओमप्रकाश मुडे, चंद्रशेखर रेवतकर आदी मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते नितीन सुकळकर म्हणाले स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन युवकांसाठी एक विशेष आणि यादगार दिवस म्हणून पाहिला जावा, यासाठी 12 जानेवारी या दिवसाला महत्त्व देण्यात आलं. स्वामी विवेकानंद यांची काम करण्याची पद्धत, त्यांचे विचार, त्यांचा अभ्यास, त्यांचं योगदान हे भारतीय युवांसाठी एक आदर्श आणि प्रेरणास्त्रोत व्हाव, या उद्देशानं स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.
विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतर सद्गुणांचे बारकावे शिकण्याचे आवाहन केले. तरुण पिढीने केवळ धाडसी नसून संयमी आणि सहनशील असले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने शिकले पाहिजे आणि देशाला पुढील स्तरावर नेले पाहिजे, असे नितीन सुकळकर म्हणाले. याप्रसंगी प्राची पाचखेडे आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या, स्वामी विवेकानंद हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. धर्म, इतिहास, कला, समाज, विज्ञान, साहित्य सगळ्याच क्षेत्राची त्यांना जाण होती. शिक्षणासोबतच शास्त्रीय संगिता बाबतही त्यांना माहिती होती. एक उत्तम खेळाडू म्हणूनही स्वामी विवेकानंद यांच्याकडे पाहिलं जातं. आपल्या अलौकिक विचारांमधून त्यांनी असंख्य तरुणांना दिशा, प्रेरणा आणि प्रोत्साहित केलं.
स्वामी विवेकानंद जयंती निमित्य विद्यार्थ्याकरिता विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी विजयी विद्यार्थ्याना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ओमप्रकाश मुडे तर आभार विकास नागरकर यांनी केले.

