अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १५ जाने:– नांदागोमुख येथील गोमुख विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तथा गोमुख विद्यानिकेतन कॉन्व्हेन्ट यांचा संयुक्त तीन दिवसीय वार्षिकोत्सव ‘ झेप…..२०२५’ थाटात संपन्न झाला. वार्षिकोत्सवाचे उदघाटन शिक्षक आमदार मा.सुधाकरराव अडबाले यांचे हस्ते पार पडले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मोहन मोवाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अरविंद लोंढे RMOC, AIM निती आयोग भारत सरकार नवी दिल्ली, डॉ.नामदेव मोरे प्राचार्य नवभारत कनिष्ठ महाविद्यालय गोंडखैरी, संस्थेचे सचिव प्रा.दिनकर जीवतोडे, पंचायत समितीचे सभापती गोविंद ठाकरे, सरपंच ज्योती मोवाडे, प्रा.रवी झाडे चंद्रपूर, प्रा.दिलीप मोरे, मुख्याध्यापक महादेव खरबडे, कॉन्व्हेन्टच्या मुख्याध्यापिका पूजा केरडे उपस्थित होते.
सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पाहुण्यांच्या हस्ते अटल प्रदर्शनी,विज्ञान प्रदर्शनी व चित्रकला प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी काही निवडक नृत्याविष्कार सादर करून पाहुण्यांचे लक्ष वेधून घेतले.’भविष्यात यशस्वी व्हायचे असेल तर मोठी स्वप्न पहा ‘ असा संदेश आमदार सुधाकर अडबाले यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्याना दिला.
याप्रसंगी रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा, गीतगायन स्पर्धा व विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कॉन्व्हेन्ट ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका व विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. समारोप व बक्षीस वितरण समारंभ संस्थेचे अध्यक्ष मोहन मोवाडे यांचे अध्यक्षतेखाली व शिक्षण विस्तार अधिकारी पुरुषोत्तम मुंढे, सचिव प्रा.दिनकर जीवतोडे, माजी मुख्याध्यापक साहेबराव इंगळे, निर्मला कांबळे, शिक्षक प्रतिनिधी राजेंद्र चवडे, विद्यार्थी प्रतिनिधी गणेश खाटीक, विद्यार्थिनी प्रतिनिधी भावना वाढी, मुख्याध्यापक महादेव खरबडे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी शाळेच्या माजी विद्यार्थिनी सौ दीपा सुपले व सौ.वैशाली भोयर या भगिनींनी त्यांचे वडील स्व.अकर्ते गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेच्या ग्रंथालयास पुस्तके भेट दिली.विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ओमप्रकाश मोवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश चीमलवार व प्रमोद चरडे यांनी मानले. या कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

