अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यात पतसंस्था चळवळीस बहर आला असून बावीस हजारांहून अधिक पतसंस्था कार्यरत आहे. सामान्य लोकांचा विश्वास पत संस्थावर आहे. राज्यातील पतसंस्थाना लोकमान्यता मिळाली मात्र राजमान्यता मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सहकार भारती चे राष्ट्रीय प्रकोष्ठ प्रमुख बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश देशपांडे यांनी केले.
ते वर्धा जिल्हा सहकार भारती आणि पत संस्था संघाचे संयुक्त विद्यमाने आयोजित पत संस्थाचे संचालक व कर्मचारी यांच्या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
बोलताना ते पुढे म्हणाले की अनेक पतसंस्था राज्यात चांगले काम करीत आहे. ज्या पतसंस्था चांगले कार्य करीत आहे. त्यांना शासकीय योजनांमध्ये सहभागी करण्यात यावे. खर तर शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पतसंस्था शिवाय दुसरा पर्याय नाही असे म्हणाले. यावेळी मार्गदर्शन करताना राज्याच्या सहकार व वस्रोद्योग विभागाचे सहसचिव संतोष पाटील यांनी वर्धा जिल्हा सहकारी बँक सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. प्रशिक्षण वर्गात सहकार भारती चे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी यथोचित मार्गदर्शन केले. पत संस्थाचे व्यवस्थापन व ताळेबंद यावर अशोक नाईक, पत संस्थाची वसुली महेश जाधव यांनी प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन एम गिरी वर्धा येथे करण्यात आले होते. यावेळी उद्घाटन प्रसंगी जिल्हा उपनिबंधक सीमा पांडे, सहकार भारती चे राष्ट्रीय पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख गिरीश देशपांडे, सहकार व वस्रोद्योग विभागाचे सहसचिव संतोष पाटील, वर्धा जिल्हा सहकारी बँक चे राजेंद्र कौसडीकर , सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश सचिव विनोद भिमनवार, वर्धा नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मंगेश परसोडकर वर्धा जिल्हा पतसंस्था संघाचे अध्यक्ष सुधाकर घवघवे, वर्धा जिल्हा सहकार भारती चे अध्यक्ष प्रभाकर कोळसे उपस्थित होते. संचालन प्रा लिना शेंडे यांनी तर आभार वर्धा जिल्हा सहकार भारती चे महामंत्री श्याकुमार खत्री यांनी मानले.

