मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दी १८ जानेवारी रोजी नगरपरिषद हिंगणघाट द्वारा संचालित पीएमश्री लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 पीएमश्री उपक्रमांतर्गत एक्सपर्ट टॉक कॉमुनिकॅटिव / स्पोकन इंग्लिश ह्या विषयावर तज्ञ म्हणून संदेश मून (बिई, एमबीए, नेट (जेरफ)) ह्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. आजही प्रगत शिक्षण स्पर्धेत नगर परिषदेच्या शाळाच श्रेष्ठ आहेत असे मत त्यांनी जाहीरपणे मांडले.
त्यांच्या मते विद्यार्थ्यावर वाढता अभ्यासाचा ताण, विद्यार्थ्यांना शाळा व अतिरिक्त शिकवणीमध्ये गुंतवल्यामुळे शिक्षण ही एक जीवघेणी चढाओढ होत आहे. त्यामधे नगरपरिषद शाळामध्ये विद्यार्थी मानसशास्त्राची जोड, नेमके शालेय तास ,आणि सर्वगुणसंपन्न शिक्षक समावेशाने विशिष्ट ताणविरहित शिक्षण प्रणाली जोपासली गेली आहे. ती प्रणालीच विद्यार्थ्यासाठी अती तणावाच्या वातावरणात एक दुआ आहे.
शिक्षण क्षेत्रात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे संदेश मून ह्यांनी ह्या कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजीत बोलके केले. इंग्रजी भाषा जागतिक स्तरावर बोलली गेलेली ती फक्त भाषा नसून सर्व जगावर साम्राज्य स्थापित करण्यास लागणारी ऊर्जा तीमध्ये आहे. सध्याचे युग ग्लोबल क्रांतीचे असल्यामुळे जग छोटे झालेले आहे. ह्या अशा अवाढव्य जगामध्ये इंग्रजी आत्मसात करणे विद्यार्थी व शिक्षकांसाठी अतिमहत्वाचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गिरीधर कोठेकर होते. भाषेबद्दल म्हणाले की, “प्राथमिक स्तरावर इंग्रजी हा विषय भाषा विषय म्हणून शिकवायचा आहे. भाषा विषय शिकवताना ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या पायऱ्यांनी गेलो तरच मुले स्वतः आपोआप आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनात उत्तम इंग्रजी संवादक होऊ शकतील. शाळेत दररोज एक इंग्रजी तास स्थापित करून विद्यार्थी व शिक्षक ह्यांनी त्या तासात फक्त इंग्रजी संवाद करावा म्हणजे भाषेचा सराव सहजच होईल. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैशाली दिपक चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. शाळेतील जेष्ठ शिक्षक शेषराव म्हैस्के यांनी संचालन केले. तर शिक्षिका कविता चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी शाळेतील शिक्षक चंद्रशेखर कोठेकर व मीना आडकिने यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य वैशाली भडे, प्रियंका गावंडे, मानसी कोल्हे यांनी सहकार्य केले. शाळेत असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी शाळेचे कौतुक केले. नगरपरिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी प्रविण काळे यांनी उपक्रमाच्या यशस्वीते बाबत शाळेतील सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

