अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १७ जाने:- सावनेर येथे भारतीय जनता पार्टी व तालुकाध्यक्ष श्री.मंदार दादाराव मंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन १७ जानेवारीला आमदार डॉ.आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. स्थानिक जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हे कार्यालय म्हणजे हक्काचं ठिकाण असेल. नागरिकांना आता सहज भाजपा जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करून कामे मार्गी लावता येणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. राजीव पोतदार, रामराव मोवाडे, संजय टेकाडे, अशोक धोटे, राजु घुगल, रवींद्र ठाकूर, तुषार उमाटे, कुलभूषण नवधिंगे, नरेंद्र ठाकूर, सुजित बागडे, राजुजी भुजाडे, आशिष फुटाणे, महेश चकोले, पंकज भोंगाडे, रत्नाकर ठाकरे, पिंटू सातपुते, प्रज्वल कांबळे, दिनेश कडू इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

