मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.१९:- हिंगणघाट:- गिमाटेक्स इंडस्ट्री प्रा.लि. वणी ता. हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील राजेंद्र आखाडे रा.वणी छोटी हा कामगार इंजिनिअरींग विभागात कामगार म्हणून काम करीत होता काही कारणास्तव आजाराने त्याचा मृत्यू झाला त्या अनुषंगाने संघटना व व्यवस्थापनाच्या करारा प्रमाणे वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटने अध्यक्ष तथा आमदार समिर कुणावार व संघटनेचे उपाध्यक्ष मिलिंद देशपांडे यांच्या निदर्शनानुसार गिमाटेक्स व्यवस्थापन श्री. पठाण यांना पाठपुरावा करून सर्व कामगारांच्या पगारातुन प्रती 100 रुपये कपात करून मृत्यू पावलेल्या च्या परीवाराला एकूण रुपये 140300 धनादेश देण्यात आला.
त्यावेळी उपस्थित संघटनेचे पदाधिकारी व कामगार जनरल सेक्रेटरी पांडुरंग बालपांडे, कोषाध्यक्ष दामोदर देशमुख, जयंत बावणे, दिवाकर बरबटकर, राकेश रताळे, हेमंत भगत, प्रशांत शेळके, जिवण भानसे, श्रावण थुटे, विनोद कावळे, राहुल देशमुख, विजय थुल, विनोद कोल्हे, लक्ष्मण जयपुरकर, मनोज जुमडे ई.कामगार उपस्थित होते.

