संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारे इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे दुसऱ्या पालक – शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सभेला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे व पालक वर्गांचे शब्द सुमनाने स्वागत करून मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन मजहर सर यांनी केले. त्यानंतर शालेय क्रीडा स्पर्धेत विविध खेळात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नुकत्याच पार पडलेल्या ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पालक वर्गांना आपल्या पाल्याबाबत व शाळेत होत असलेल्या सहशालेय उपक्रमाबाबत आणि शाळेच्या प्रगतीसाठी काही उपाययोजना करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोणे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या सभेचे सूत्रसंचालन सुधीर सर व मजहर सर यांनी केले तर सगळ्यांचे आभार ज्योत्स्ना टेकाम यांनी मानले. या सभेला पालक वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

