प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- तालुक्यातील डोंगरगाव येथे जय बजरंग स्पोटी क्लब द्वारा आयोजित दोन दिवसीय 55 किलो वजन गटातील कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या कबड्डी सामन्याचे कार्यक्रमांचे अध्यक्ष समुद्रपूर बाजार समितीचे सभापती हिम्मतराव चतुर हे होते तर उद्घाटन हिंगणघाट बाजार समितीचे संचालक डॉ. निर्मेश कोठारी यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समुद्रपूर बाजार समितीचे उपसभापती वामन चंदनखेडे, संकेत गवळी, माजी सरपंच संजयजी वरघणे, माजी उपसरपंच सुभाषराव चंदनखेडे, पोलीस पाटील राजुजी दांडेकर, माजी सरपंच अरविंद झाडे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय कारवटकार, विट्टलराव सुपारे, श्रावण कामडी तसेच मंडळाचे अध्यक्ष रितिक बरडे, उपाध्यक्ष आदित्य गिरडे, सचिव चंद्रशेखर वैरागडे, सहसचिव प्रल्हाद चंदनखेडे, कोषाध्यक्ष कार्तिक बावणे व कार्यकर्ते, खेळाडू व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

